घर घेण्याच्या विचारात आहात? तर ‘या’ बँकेकडून होम लोनवरील व्याज दरात मोठी कपात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कोटक महिंद्रा या खासगी बँकेने होम लोनच्या व्याजावर मोठी कपात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने 7 टक्क्याने होम लोन देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोटक महिंद्राचा हा होम लोन दर भारतीय स्टेट बँकेच्या होम लोन दरा एवढाच झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Kotak Mahindra Bank launch festive campaigns)

कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांसाठी ‘खुशी का सीजन’ नावाची खास ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर एक महिन्यापर्यंत चालेल. दुसऱ्या बँकेतील कर्ज बंद करून कोटक महिंद्रामध्ये हे कर्ज वर्ग करणाऱ्या ग्राहकांनी बॅलन्स ट्रान्सफर केल्यास त्यांची 20 लाख रुपयांपर्यंतची बचत होईल, असं या बँकेने म्हटलं आहे. या नव्या योजनेनुसार बँकेने ग्राहकांना कर्ज देण्यापासून ते शॉपिंग करण्यापर्यंतच्या गोष्टीवर ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या बँकेची क्रेडिट ग्रोथ गेल्या अनेक वर्षांपासून 6 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”. 

Leave a Comment