Kotak Mahindra Bank | RBI चा मोठा निर्णय ! ‘या’ कारणामुळे कोटक महिंद्र बँकेवर लादले निर्बंध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Kotak Mahindra Bank खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक ही एक लोकप्रिय बँक आहे. आता या बँकेवर आरबीआयकडून एक कारवाई करण्यात आलेली आहे. ती म्हणजे आता या बँकेला ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदण्यावर रिझर्व बँकेने निर्बंध आणलेले आहेत. बँकेच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या 2022 आणि 23 या वर्षातील अभ्यासातून आढळून आलेल्या समस्या आणि उणीवांमुळे बँक यावर निराकरण करण्यात यशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध लादणे गरजेचे होते. असे आरबीआयने सांगितले आहे.

त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) नवीन क्रेडिट कार्डचे वितरण देखील आता करता येणार नाहीये. तरीदेखील या बँकेचे जे क्रेडिट कार्ड ग्राहक आहेत. त्यांना इतर सर्व प्रकारच्या सेवा प्रदान सुरू ठेवण्यात येणार आहे. कोटक महिंद्रा बँकेमध्ये ऑनलाइन माध्यमातून नवीन खाते उघडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यावर आता निर्बंध आले आहेत.

गेल्या दोन-तीन वर्षापासून रिझर्व बँकेने कोटक महिंद्रा बँकच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीतील जोखीम व्यवस्थापन विक्रेता जोखीम व्यवस्थापन सुरक्षा आणि विधा प्रतिबंधक धोरण यांचे मूल्यांकन केले होते. त्यानंतर यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. बँकेच्या तपासणी दरम्यान याची सुसंगत माहिती तंत्रज्ञान प्रणाली आणि नियंत्रण तयार करण्यात अपयश आल्याने यावर निबंध टाकण्यात आलेले आहे.

कारवाई कशामुळे? | Kotak Mahindra Bank

रिझर्व बँकेने गेल्या दोन वर्षात म्हणजे 2022 आणि 2023 यामध्ये मूल्यांकन आढळून आलेल्या, उणीवानंतर त्यांनी केलेल्या सुधारणात्मक कृती योजनांचे कोटक महिंद्रा बँकेने कोणत्याही प्रकारचे पालन केले नाही. यामुळे त्यांचा अहवाल एकतर अपुरा आणि योजलेले उपाय चुकीचे होते. असे रिजर्व बँकेने म्हटलेले आहे. त्यामुळे त्यांच्या डिजिटल बँकिंग आणि देयक प्रणालीच्या आर्थिक गोष्टींमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. परंतु यावर बँकेने काहीच केले नसल्याने आरबीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे.