कोथरूडमध्ये यंदाचा आमदार ‘हा’ चेहरा असेल

Kothrud
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा पुण्याचा गड आला… मुरलीधर मोहोळ खासदार होऊन केंद्रीय मंत्री झाले… पण ज्या बालेकिल्ल्यातून ही सगळी सूत्र हलली त्या कोथरूड विधानसभेत यंदाही चंद्रकांत पाटीलच निवडून येतील का? हा प्रश्न विचारण्याचा तसा मुळात प्रश्नच येत नाही… कारण कोथरूड (Kothrud Constituency) हा भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला… इथला मतदार हा भाजपच्या पाठीशी डोळे झाकून उभा राहतो… म्हणूनच बाहेरचे असूनही चंद्रकांत पाटलांना कोथरूडच्या जनतेनं मागच्या टर्मला विधानसभेला पाठवलं… त्यात विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याही प्रभावक्षेत्राखाली हा भाग असल्यानं चंद्रकांत दादांना तसं भिण्याचे काही कारण नाही… पण इथे सध्या शरद पवार काही राजकीय चाली खेळतायेत… त्यांचे डाव परफेक्ट बसले तर पाटलांच्या राजकारणाला बालेकिल्ल्यातच धक्का पोहोचू शकतो… भाजपच्या बाजूने सगळं वातावरण प्लस मध्ये असताना… भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला असताना… चंद्रकांत पाटलांसारख्या पक्षातील मातब्बराला टक्कर देण्याची हिंमत महाविकास आघाडीतील कोणता चेहरा करेल? राष्ट्रवादीची तुतारी हाताच्या पंजाला हा मतदारसंघ सोडेल का? ब्राह्मण मतदार अपेक्षेपेक्षा काही वेगळा कौल देऊ शकतील का? याच सगळ्याचं इन डेप्थ राजकीय विश्लेषण

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती कोथरूड विधानसभेची… कारण विधान परिषदेवर नेहमीच निवडून जाणाऱ्या आणि दरबारी राजकारणी म्हणून ज्यांना विरोधक चांगलेच कानपीचक्या देत होते… त्या चंद्रकांत पाटलांनी एक मोठा निर्णय घेतला… कोल्हापुरातील राजकारणाचं पाणी पिऊन देखील त्यांनी विधानसभेला मतदारसंघ निवडला तो पुण्यातील अस्सल पुणेरी असणाऱ्या कोथरूडचा… चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात राहून राजू शेट्टींच्या वर्चस्वाला अनेकदा आव्हान दिलं होतं… त्यात चंद्रकांत दादांचं नाव भाजपच्या पहिल्या फळीत घेतलं जात असल्यामुळे त्यांना निवडून आणणं हा भाजपसाठी महत्त्वाचा नाही… तर अगदी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता… हे सगळं समीकरण पाहून त्यांना कोथरूड मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला… कारण भाजपचा बालेकिल्ला, संघाची मोठी ताकद, पारंपारिक मतदार हे सगळं जुळून येणार असल्यामुळे त्यांचा विजय जवळपास कन्फर्म समजला जात होता… पण बाहेरचा नको स्थानिक हवा… आमचा आमदार कोथरूडचा हवा… अशी मागणी कोथरूडच्या जनतेने केल्याने… आणि मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापल्यामुळे ब्राह्मण मतदार नाराज झाल्यानं… चंद्रकांत दादांसाठी कोथरूडचं घोडे मैदान रिस्की होतं…

2019 ला चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी झुंज दिली… निवडणूक झाली… निकाल लागला… चंद्रकांत पाटील जिंकले देखील… पण लीड होतं अवघं 25 हजारांचं… भाजपचा हा बालेकिल्ला असल्यानं विजयाचं मार्जिन हे जास्त असेल, असं सर्वांनाच वाटलं होतं… यावरून कोथरूडकरांनी 2019 च्या निकालातूनच आम्हाला ग्राह्य धरू नका… असा जणू अप्रत्यक्ष इशाराच दिला… कोथरूड मतदारसंघ हा पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता. पूर्वीचा शिवाजीनगर व 2009 नंतर झालेला कोथरूड मतदारसंघात 1980 पासून भाजप-शिवसेना युतीचेच उमेदवार निवडून येत आहेत. यापूर्वी खासदार अण्णा जोशी, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, शिवसेनेचे विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले… पण 2009 च्या पुनर्रचनेत नवा कोरा कोथरूड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला… तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांनी कोथरूड चा पहिला आमदार होण्याचा मान मिळवला… मनसेच्या किशोर शिंदेंना त्यांनी पराभूत केलं होतं…

पण 2014 ला शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली… भाजपच्या बाजूने वारं होतच… तेव्हा मेधा कुलकर्णी त्यांनी आमदारकीचा गुलाल कपाळाला लावत कोथरूड मध्ये फक्त भाजपच! हे जणू ठासून सांगितलं… नंतर चंद्रकांत पाटलांना लॉन्च करण्यासाठी हा मतदारसंघ निवडल्याने स्टँडिंग आमदार असूनही तिकीट कापल्याने कुलकर्णी नाराज झाल्या होत्या… त्याचंच रिफ्लेक्शन 2019 च्या घटलेल्या लीडमध्ये आपण पाहिलंच…पण सध्या भाजपसाठी परिस्थिती तशी ओके आहे… मेधा कुलकर्णी यांची वर्णी राज्यसभेवर केल्यानं पारंपारिक ब्राह्मण मतदार पुन्हा भाजपच्या पाठीशी आला… म्हणूनच लोकसभेच्या निकालात एकट्या कोथरूडनं 74 हजार मतांची मोठी आघाडी दिली… हा आकडा सांगून देतोय की कोथरूडकर आजही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत… त्यात शहरी विकास म्हणून ज्या काही गोष्टी लागतात त्यांची पूर्तता करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी पुरेसे प्रयत्न केले आहेत… त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा कोथरूडची जागा चंद्रकांत दादांना सेफ आहे… फक्त पवारांनी(Sharad pawar) ऐन निवडणुकीच्या रंगात काही पत्ते खुले केले, तर कोथरूडच्या राजकारणाला नवं वळण लागू शकतं…

गेल्या वर्षी चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदे यांनी लढत दिली होती… पण आता मनसेच भाजपच्या टप्प्यात आल्यानं ते निवडणुकीवर किती प्रभाव टाकतील? हे सांगता येत नाही… तर 2009 ला ज्यांनी शिवसेनेचा झेंडा कोथरूडवर फडकवला होता.. ते चंद्रकांत मोकाटे सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत… त्यांनी या आधीच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करून टाकलाय… शरद पवारांसोबत त्यांची भेट झाल्यानंतर कोथरूडसाठी काहीतरी महाविकास आघाडीकडून फील्डिंग लागतेय… एवढं मात्र नक्की…त्यामुळे शरद पवारांची साथ, ठाकरेंची सहानुभूती, मोकाटेंचा जनसंपर्क हे सगळं चंद्रकांत दादा आणि भाजपच्या प्रस्थापित बालेकिल्ल्याला कोथरूडमध्ये धक्का लावतील का? हे पाहणं येणाऱ्या काळात इंटरेस्टिंग ठरेल… बाकी दगड जरी उमेदवार दिला तरी तो निवडून येईल, असा कॉन्फिडन्स बाळगणाऱ्या भाजपचा हा बालेकिल्ला आणि चंद्रकांत दादांची आमदारकी यंदाही कायम राहणार का? पुण्याचा लोकसभेला गड आला… मोहोळांचा रूपानं सिंह देखील आला… पण आता कोथरुड रुपी बालेकिल्ला हातचा जाऊ न देणं… याकडे ही भाजपला लक्ष द्यावं लागेल… एवढं मात्र नक्की…