कोयना धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्या कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 1 फुट 9 इंचांने उघडण्यात आले आहेत. धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून  9200 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

पायथा वीजगृहातुन 1050कयुसेक असा एकुण 10350 कयुसेक पाणी नदीपात्रात विसर्ग सुरु केला आहे. 105 tmc पाणी साठवण क्षमतेच्या कोयना  धरणात 86.6 tmc पाणीसाठा झाला असुन जोरदार पाऊस सुरु आहे. धरणात 41391 कयुसेक पाण्याची आवक होत असुन धरणातील  पाणी नियमनासाठी दरवाजे उघडुन विसर्ग करणेचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.