कोयना धरण भरले : तांबवे व निसरे बंधारे पाण्याखाली तर मूळगाव पुलाला पाणी टेकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण अखेर भरले असून सध्या धरणातून 42 हजार 331 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात 105.03 इतका टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 44 हजार 966 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल शुक्रवारी सकाळी 10 वाजता 42 हजार 331 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे. कोयना नदीपात्रातील तांबवे व निसरे हे कोल्हापूर पध्दतीचे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले असून मूळगाव पूलाल पाणी टेकले आहे.

Koyana Dam

काल शुक्रवारी सकाळी 10 वाजता 4 फूट 6 इंच वक्र दरवाजे उचलून 41 हजार 281 क्युसेस तर पायथा विद्युत गृहातून 1 हजार 50 पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. कोयना व कृष्णा नदीपात्राच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली असून अनेक ठिकाणी नदीपात्राबाहेर पाणी गेले आहे. नदीकाठच्या शेती पाण्याखाली गेलेल्या आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर वाढल्यास अनेक ठिकाणी स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना क्षेत्रात 71, नवजा 87 तर महाबळेश्वर येथे 56 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयना धरणाचे बॅकवाॅटर असलेल्या महाबळेश्वर परिसरात पावसाची जोरदार बॅंटीग सुरू आहे. तेव्हा नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे. गेल्या तीन दिवसात चाैथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.