सातारा | सकलेन मुलाणी
काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात कराड तालुक्यातील मुंढे येथील शहीद जवान संदीप सावंत यांना वीरमरण आले होते. शहीद जवान संदीप यांच्या कुटुंबियांना कृष्णा सहकारी बँकेच्या वतीने एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. विरपत्नी सविता संदीप सावंत यांच्याकडे माजी मंत्री डॉक्टर अतुल भोसले यांनी एक लाख रुपयाचा निधी सुपूर्द केला.
शहीद जवान संदीप सावंत यांच्या कुटुंबातील एकाला तरी नोकरीमध्ये घ्यावे अशी आम्ही विरोधी पक्षनेत्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती डॉ.अतुल भोसले यांनी दिली.