कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी कृष्णा परिवाराकडून ५० लाखांचा मदतनिधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

देशभर झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी कराड येथील कृष्णा परिवार पुढे सरसावला आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी कृष्णा परिवारातील विविध संस्थांच्या माध्यमातून पी.एम. केअर फंडाकडे लवकरच सुमारे 50 लाख रूपयांचा निधी सुपूर्द करणार असल्याचे कृष्णा परिवाराचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केले आहे.

कोरानाचा सामना करण्यासाठी कृष्णा परिवाराने पूर्वीपासूनच अनेक उपाययोजना केल्या आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना संशयित व बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी 110 बेडचे सुसज्ज असे स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी लहान मुले, महिला व पुरूष रूग्णांसाठी स्वतंत्र विभाग असून,  स्वतंत्र आयसीयु विभाग व व्हेंटिलेटरची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफ यामुळे कृष्णा रूग्णालयातील या विशेष वॉर्डमध्ये आज मोठ्या प्रमाणात संशयित रूग्णांना दाखल केले जात आहे. त्यांच्यावरील चाचण्यांसाठीही येथे दोन स्वतंत्र रोगनिदान प्रयोगशाळा असून, शासनाकडून परवानगी मिळाल्यास याचठिकाणी कोरोनाची चाचणी करणे शक्य होणार आहे. रूग्णसेवेबाबत सर्वोच्च सेवा पुरविणाऱ्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने शासनाच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी 40 लाखांचा मदतनिधी जाहीर केला आहे. तसेच कृष्णा परिवारातील जयवंत शुगर्स साखर कारखान्यानेही 5 लाख 40 हजारांचा मदतनिधी जाहीर केला आहे. याचबरोबर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातूनही मदतनिधी जाहीर केला जाणार असून, या संस्थांच्या माध्यमातून एकूण सुमारे 50 लाख रूपयांचा मतदनिधी पी.एम. केअर फंडात सुपूर्त केला जाणार असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, कृष्णा कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मितीस प्रारंभ केला आहे. लवकरच ते कृष्णेच्या सर्व सभासदांना मोफत वितरित केले जाणार असून, बाजारातही उपलब्ध होणार असल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

 

Leave a Comment