पुणे | सुनिल कमल
डॉक्टर पित्याविरुद्ध मानसिक, शारीरिक अत्याचाराचा मुलींचा आरोप, कोंढव्यातील धक्कादायक प्रकार
डॉक्टर पित्याकडुन होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्नीसह दोन मुलींची कोंढवा पोलिसांनी तक्रार न घेतल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने तक्रार घेण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले. आज पत्रकार परिषदेत पीड़ित तरुणी हेबा कुरेशीने ही माहिती दिली. या वेळी वकील आशुतोष श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्त्या विद्या म्हात्रे उपस्थित होते.
हेबा ही मेडिकल ची विद्यार्थिनी असून , डिझाइनर सुद्धा आहे. तिची आई माइक्रोबायोलोजिस्ट आहे.
हेबा म्हणाल्या वडील डॉ अहमद कुरैशी यानी मला आणि आईला बेकायदेशीररित्या घराबाहेर काढले. त्यापूर्वीही त्यांनी आमच्यावर अत्याचार केले. दुसऱ्या महिलेला त्यांनी या घरात आणले असून त्यासुद्धा आम्हाला घराबाहेर काढण्यास प्रयत्न करतात. कौंटुंबिक प्रकरणाचे कारण देत आमची तक्रार पोलिसांनी घेतली नाही उलट आम्हाला मारहाण करण्यात आली. कित्येकवेळा आम्ही इतर नातेवाईकांच्या घरी दिवस काढले. आमच्याच घरात आम्हाला जुलमी अत्याचार आणि मानसिक अत्याचार सहन करावा लागतोय.
सदर प्रकरणाची दखल घ्यावी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या विद्या म्हात्रे यानी महिला आयोगाकड़े तक्रार केली. महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या भेटीनंतर आयोगाकडून पिडितेच्या तक्रारीची ठोस अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांना आदेश दिले असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.