हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेची पडताळणी सगळीकडे सुरु असून, आता अनेक महिलांना या योजनेतून लाभ मिळणार नाही. या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून, छाननी प्रक्रियेनंतर आणखी दोन लाख महिलांना अपात्र ठरण्याची माहिती समोर आली आहे.
फेब्रुवारी महिन्याचा लाभ मिळणार नाही (Ladki Bahin Yojana) –
या योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाभ झाला होता, कारण जवळपास 2 कोटी 11 लाख 860 महिला यासाठी पात्र ठरल्या होत्या. दर महिन्याला पात्र महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहेत. पण आता पडताळली दरम्यान अनेक महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र महिलांना या महिन्याचा लाभ मिळणार नसून , त्यांच्या खात्यात निधी जमा होणार नाही .
योजनेचे 2.5 कोटी लाभार्थी –
2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये 83% महिला विवाहित आहेत.
अविवाहित महिलांची संख्या 11.8%
विधवांचा वाटा 4.7% आहे. (Ladki Bahin Yojana)
घटस्फोटित, निराधार, आणि सोडून दिलेल्या महिलांची संख्या 1% पेक्षा कमी आहे.
घटस्फोटित महिलांचा 0.3%, सोडून दिलेल्या महिलांचा 0.2% आणि निराधार महिलांचा 0.1% आहे.
वयोगटानुसार संख्या –
30-39 वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे,
21-29 वयोगटातील महिलांचा 25.5% वाटा आहे,
40-49 वयोगटातील महिलांचा 23.6% आहे.
21-39 वयोगटातील महिलांचा 78% आहे.
50-65 वयोगटातील महिलांचा 22% आहे.
60-65 वयोगटातील महिलांचा 5% आहे.