Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 कधी देणार?? एकनाथ शिंदेंची सभागृहात मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची मदत केली जाते, परंतु सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपये कधी देणार असा सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात केला. यावर उत्तर देताना योग्य वेळ आली कि आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं मोघम उत्तर एकनाथ शिंदेनी दिले.

नेमकं काय घडले? Ladki Bahin Yojana

नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेतील त्रुटी वर बोट ठेवत सरकारला धारेवर धरले. लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुक-अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल, अशा शब्दात नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. तसेच २१०० रुपये तुम्ही देतो म्हणाला होता ते कधी देणार असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. Ladki Bahin Yojana

एकनाथ शिंदेच उत्तर

नाना पटोले यांच्या एकामागून एक प्रश्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. नानाभाऊ, तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलून नये. या योजनेला तुम्ही विरोध केला होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील. तसेच आता राहिला प्रश्न तो म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार?तर आम्ही योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभही देऊ, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी आजही सांगतो अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.