Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना गुड न्यूज; 9% व्याजदराने कर्ज मिळणार

Ladki Bahin Yojana Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आणखी एक गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला सरकार कडून १५०० रुपये मिळत तर आहेतच. आता तर महिलांना कर्ज सुद्धा मिळणार आहे, ते सुद्धा ९ टक्क्यांनी…. होय, तुम्ही जे वाचताय ते अगदी खरं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईत शासकीय महामंडळांच्या महिलांसाठीच्या व्याजपरतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक मदत– Ladki Bahin Yojana

महिलांना सरकार ९% व्याजदराने कर्ज देणार आहे त्यामागे मोठं कारण आहे. महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात देण्यात येणार असून या पैशाचा वापर व्यवसाय आणि उद्योग सुरु करण्यासाठी महिलांना (Ladki Bahin Yojana) होऊ शकतो. हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळांच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविला जाणार आहे. पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कर्ज योजना कार्यान्वित आहेत. या निर्णयामुळे महिलांना उद्योगाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार मिळेल आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

यावेळी मुंबई बँकेचे व्यवस्थापीय संचालक आमदार प्रविण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महामंडळाचे प्रतिनिधी, वित्त आणि महिला व बालविकास विभागाचे सचिव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) चांगलीच जबरदस्त ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जुलै 2024 पासून हि योजना सुरु झाली असून आत्तापर्यंत 1500 रुपयांचे ११ हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता जून महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा महिलांना आहे. मात्र तत्पूर्वीच सरकारने या महिलांना ९ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.