हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. यामुळे आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्यामुळे अनके महिलांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत कि, सरकारने दिलेले पैसे आता माघारी द्यावे लागणार कि काय ? त्यावर आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तर ती कोणती आहे , हे आज आपण पाहणार आहोत. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
आदिती तटकरे यांची योजनेसंदर्भात अपडेट (Ladki Bahin Yojana)-
आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या 2 लाख 30 हजार, वय 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या 1 लाख 10 हजार, तसेच चारचाकी वाहन असलेल्या महिलांची संख्या 1 लाख 60 हजार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले कि , “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ परत घेतला जाणार नाही. तसेच, अपात्र ठरलेल्या महिलांना जानेवारी 2025 पासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही” , असे त्यांनी सोशल मीडियावर सांगितले.
पडताळणीमुळे अनके महिला या योजनेसाठी अपात्र –
अपात्र महिलांची माहिती मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत घराघरात जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली जात आहे. या चौकशीमध्ये महिलांच्या (Ladki Bahin Yojana) आर्थिक स्थितीची तसेच चारचाकी वाहनांच्या मालकीची तपासणी केली जात आहे. या पडताळणीमुळे अनके महिला या योजनेसाठी अपात्र आहेत हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना येत्या महिन्याचा हप्ता मिळणार नाही, तसेच ताज्या पडताळणीमध्ये 5 लाख महिलांना अपात्र ठरवले गेल्याने, या योजनेच्या कार्यवाहीबद्दल महिलांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे, पण सरकारच्या वतीने कोणत्याही रकमेची वसुली केली जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.