हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या मुद्यावर सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी विधानसभेत या मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत , आणि त्यानंतर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी अत्यंत सुरक्षित आणि बचावात्मक उत्तर दिलं आहे. त्यांच्या या योजनेवर आरोप केला जात आहे की, सरकारने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अजूनही केली नाही. या दरम्यान , मंत्री अदिती तटकरेंनी उत्तर देताना हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोडला असून , याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगितले आहे.
1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये करू (Ladki Bahin Yojana) –
निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती, तेव्हा हि योजना गेमचेंजर ठरली. या दरम्यान सरकारने लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते कि, आम्ही 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये करू , पण अजूनही हे आश्वासन पूर्ण झाले नाही . त्यामुळे लाखो बहिणी निराश झाल्यात. आता या योजनेवर विरोधकांनी टीकेचा जोर धरला आहे.
विरोधकांची टीका –
विरोधकांचे म्हणणे आहे की, “विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात सरकारने मोठा गाजावाजा करत हप्ता (Ladki Bahin Yojana) ‘1500 रुपये वरून 2100 रुपये करणार’ असं आश्वासन दिलं. पण सरकारने ते पूर्ण करण्याचे टाळले आहे.” मंत्री अदिती तटकरेंनी यावर उत्तर देताना सांगितलं की, “2100 रुपयांचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच हे निर्णय घेतले जातील.” पण बहिणींना निराश केले जाणार नाही. त्यामुळे त्यांनी काळजी करून नये , असे सांगितले आहे.
सरकार आश्वासन पूर्ण करणार ? –
आता प्रश्न उभा राहतो की, या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होईल? की लाडकींना 2100 चं गाजर दाखवत फसवणूक केली जाईल? विरोधकांचा दावा आहे की, सरकारने या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लाडकींना (Ladki Bahin Yojana) मिळणार असलेल्या हप्त्याचं भविष्य आता सरकारच्या पुढील पावलांवर आहे. आता, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, सरकार किती वेळात हे आश्वासन पूर्ण करतं आणि त्याचा लाडकींवर कसा परिणाम होतो.