हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींना आता 3000 मिळणार? समोर आली मोठी अपडेट्स । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. परंतु सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याचे पैसे न मिळालेले महिला वर्ग चिंतेत आहे. ऑगस्ट चा हप्ता नेमका मिळणार तरी कधी?? असा सवाल लाडक्या बहिणीकडून केला जात असतानाच आता या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
आतापर्यंतचा इतिहास बघितला तर सरकार जेव्हा सणासुदीचा काळ असतो तेव्हा त्या निमित्ताने महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे (Ladki Bahin Yojana August Installment) जमा करतात. जसे की यापूर्वी रक्षाबंधनला हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आताही गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे त्यामुळे, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना मिळेल असं बोललं जात होतं. मात्र गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींना ऑगस्ट चा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा कदाचित अनंत चतुर्थीला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे मिळून एकदम तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. मात्र हे हप्ते एकत्र देणार की दोन वेगवेगळ्या तारखांना प्रत्येकी दीड हजार रुपये जमा होणार याबाबत कोणती स्पष्टता नाही. सरकारकडून सुद्धा या संदर्भात कोणती अधिकृत अशी माहिती किंवा घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु जस आम्ही म्हटलं त्याप्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्र असे तीन हजार रुपये महिलांना मिळाल्यास सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणीसाठी (Ladki Bahin Yojana August Installment) ही सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट ठरेल.
26 लक्ष लाभार्थी अपात्र– Ladki Bahin Yojana August Installment
दरम्यान,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.




