Ladki Bahin Yojana: अखेर प्रतीक्षा संपणार!! लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार

0
4
ladki bahin yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ladki Bahin Yojana| महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. गेल्या सात महिन्यांपासून या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना जुलै ते जानेवारी पर्यंतचे पैसे खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आता लाभार्थी महिला फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याची तारीख समोर आली आहे.

सात महिन्यांमध्ये मिळाले 10,500

लाडकी बहिणी योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानुसार, जुलैपासून जानेवारीपर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला एकूण 10,500 रुपये देण्यात आले आहेत. सरकारकडून देण्यात येणारी ही रक्कम महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या योजनेच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहतात.

फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होईल? (Ladki Bahin Yojana)

सध्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, याकडे महिला आतुरतेने पाहत आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत हा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असल्याने पैसे 20 तारखेला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, इतर महिन्यांच्या हप्ते वेळेत जमा झाल्यामुळे महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा हप्ता येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत खात्यात जमा होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.(Ladki Bahin Yojana) ही तारीख जाहीर झाल्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.