हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतून २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. याकरिता आजपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी १५ दिवसात कधीही महा-इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा. तसेच या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरतील यासाठी प्रक्रिया काय आहे याविषयी जाणून घ्या.
योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार?
- महाराष्ट्र राज्याची रहिवासी असलेली महिला
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
- २२ ते ६० वयोगटातील महिला
- कुटुंबाचे उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा कमी असलेली महिला
- कोणत्याही आर्थिक योजनेतून दीड हजार रुपयांपर्यंत जास्त लाभ न घेतलेली महिला
- चारचाकी वाहन नावावर नसलेली महिला
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती??
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र वा जन्म दाखला
- बँक पासबुकची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
- योजनेच्या अटी मान्य असलेले हमीपत्र
- हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.
- त्यावेळी प्रत्यक्ष महिला उपस्थित असणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे भरता येईल?
अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
- अर्ज प्रक्रियेला १ जुलैपासून सुरुवात झाली आहे.
- 15 जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.