हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेत महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जातं, जे त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या 1500 रुपये जमा होतात . जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचा आजपर्यंत 9 हफ्त्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आता एप्रिल महिन्याच्या 10 हप्त्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. पण आता या हप्त्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. यामुळे महिलांना मोठी खुशखबर मिळाली आहे. तर तो हप्ता किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार ( Ladki Bahin Yojana) –
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला, म्हणजेच अक्षय्य तृतीया दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेचे हफ्ते आता नियमितपणे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. पण , काही कारणांमुळे प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला हप्ता मिळवण्याची योजना अयशस्वी ठरली आहे. अक्षय तृतीयाच्या खास मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना मोठी खुशखबर मिळाली आहे.
लाडकी बहीण योजना –
जेव्हा हि योजना सुरु करण्यात आली होती , तेव्हा यामध्ये काही अतिशर्ती घालण्यात आल्या होत्या. पण या नियमांचे काही महिलांनी पालन न करता लाभ घेतला आहे. अशा महिलांची (Ladki Bahin Yojana ) ओळख पटवण्यासाठी सरकारकडून विविध मोहिमांची आखणी करण्यात आली अन त्याद्वारे योजनेतील अपात्र महिलांना बाद करण्यात आले. जानेवारीत 5 लाख महिलांना अपात्र ठरवून 2 कोटी 41 लाख महिलांना अनुदान देण्यात आले होते, तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अनुदान मिळणाऱ्या महिलांची संख्या वाढून 2 कोटी 47 लाख झाली आहे. त्यामुळे या योजनेची पडताळणी ठप्प झाली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.