लाडकी बहीण योजनेत हे अर्ज बाद होणार; महिलांचं टेन्शन वाढलं

0
125
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला व बालविकास विभागाची महत्वाची योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे (ladki bahin yojana) पाहिले जाते. पण सध्या यावर मोठ्या चर्चा होताना दिसत आहेत. अनेक अर्जांची छाननी होऊन काही अर्ज बाद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या परिस्थितीमुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक महिलांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

अर्ज सरसकट बाद होणार –

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कॅबिनेट बैठकीनंतर यावर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, अर्ज सरसकट बाद होणार नाहीत. पण, अर्जांची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. योजनेंतर्गत अर्जदारांची माहिती पडताळूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ज्या अर्जदारांच्या घरात दुचाकी असेल, त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय आधारकार्डवरील माहिती जुळत नसेल किंवा अर्जदार नोकरीत कार्यरत असेल, तर त्यांनाही लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे सरकारच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकता वाढल्यास मदत होणार आहे.

अर्जाची पूर्ण तपासणी –

राज्यातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे .पण या छाननीमुळे काही महिलांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. योजनेतील अर्जदार पात्रता निकष पाळत आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. या छाननी प्रक्रियेमुळे योजनेत होणारे गैरप्रकार रोखले जाणार आहेत.