हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । काल राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. भाजपला सर्वाधिक १२०, शिंदे गटाला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ जागांवर विजय मिळाला. या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीना खुशखबर दिली आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच २१०० रूपये देणार आहोत अशी ग्वाही एकनाथ शिंदेनी दिली.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये विजय झाल्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते. यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे आणि लाडक्या बहिणींचे अभिनंदन. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत, आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या याचा मला आनंद आणि समाधान आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हि माझी आवडती योजना आहे. या योजनेला अनेकांनी विरोध केला होता, मात्र तो विरोध मोडून काढत आम्ही हि योजना सुरु ठेवली. इथून पुढेही हि योजना सुरूच राहणार आहे. कोणीही माय का लाल ही योजना (Ladki Bahin Yojana) बंद करू शकत नाही. तसेच आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार म्हणजे देणार. योग्य वेळी आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीत वाढ करू अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
योग्य वेळ येणार तरी कधी- Ladki Bahin Yojana
खरं तर मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने घोषणा केली होती कि पुन्हा आमची सत्ता आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० ऐवजी २१०० रुपये देऊ. मात्र सरकार स्थापन करून वर्ष उलटून गेलं. मात्र तरीही अजून लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळालेले नाहीत. त्यांना अजूनही १५०० रुपयेच मिळत आहेत. २१०० रुपये नेमकं मिळणार तरी कधी? याच्या प्रतीक्षेत महिला आहेत. मात्र सरकार कडून प्रत्येक वेळ योग्य वेळ आल्यावर २१०० रुपये देऊ असं सांगण्यात येत.




