हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – निवडणुकीच्या काळात जी योजना गेमचेंजर ठरली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेमार्फत महिलांना दरमहा 1500 रु दिले जातात पण 2100 रु कधी मिळणार यावर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. तेव्हा अजित पवार यांनी 2100 रुपये देण्याच्या बाबतीत खुलासा करताना सांगितले की, “सर्व सोंग करता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ.” अन आता या योजनेबद्दल अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपचे नेते परिणय फुके (Parinay Fuke) यांनीही योजनेबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. तर ते वक्तव्य काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
लाडक्या बहिणींना दरमहा 3000 रुपये मिळणार? (Ladki Bahin Yojana) –
भाजपचे नेते परिणय फुके यांनी म्हटले की, आम्ही लवकरच महिलांना 2100 रुपये देणार आहोत. तसेच, आर्थिक परिस्थिती आणखी सुधारली, तर 3000 रुपये देखील देण्याची शक्यता आहे. परिणय फुके म्हणाले, “थोडा वेळ थांबा, आमच्या लाडक्या बहिणींचा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही त्याची परतफेड नक्की करू.”
लाडकी बहीण योजना सुरु राहणार –
लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना आक्षेप घेतले आहेत. पण लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे अन योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतुद केली गेली आहे. त्यामुळे बहिणींनी चिंता करू नये असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.