हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजना जोरदार चर्चेत आहे. हि योजना राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती. आता या योजनेबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेणार असल्याची माहिती सगळीकडे पसरत आहेत. पण याबद्दल अदिती तटकरेंनी मोठी अपडेट दिलेली आहे. तर चला लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार का ? आणि अदिती तटकरेंनी याबद्दल काय माहिती दिली हे सविस्तरपणे पाहुयात.
योजनेतून 4,000 महिलांनी घेतली माघार –
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या पुन:पडताळणीबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, योजनेतून (Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज पुन:पडताळले जात आहेत. उत्पन्नाच्या मर्यादेपलीकडे गेल्या काही महिलांच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच, दुचाकीच्या पलिकडे चार चाकी वाहन असलेल्या महिलांचीही तक्रारी समोर आली आहेत. आदिती तटकरे यांच्या मते, 4,000 महिलांनी या योजनेतून माघार घेतली आहे. त्यातील अनेक महिलांनी स्वतःहून लाभ परत करण्यास सुरुवात केली आहे. हे सकारात्मक आणि प्रामाणिक पाऊल आहे.
संबंधित रक्कम परत घेतली जाईल (Ladki Bahin Yojana)-
पुन:पडताळणी प्रक्रियेत स्थानिक शासकीय कार्यालयांमध्ये योजनेचा लाभ थांबवण्याच्या अर्जांचीही मागणी केली जात आहे. यावेळी, तटकरे यांनी विरोधकांना उत्तर दिले की, योजनेतील अनियमितता तपासली जाईल आणि सरकार त्या अनियमिततेला संबोधित करून त्यासाठी आवश्यक ती कारवाई करेल. तसेच, जर कोणाकडून चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेला असेल, तर त्यांना त्याची माहिती देऊन संबंधित रक्कम परत घेतली जाईल.
लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी –
तटकरे यांनी या योजनेतून (Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या अडीच कोटी महिलांची पूर्णपणे पुन:पडताळणी न करता, एक लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या दीड कोटी महिलांची यामध्ये समावेश न केल्याचे स्पष्ट केले. या योजनेला अडीच कोटी महिलांचा व्यापक पाठिंबा असून, पुन:पडताळणीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून सरकार योग्य आणि पारदर्शक पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी करणार आहे, असंही तटकरे यांनी सांगितले.
हे पण वाचा : सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरचा मोठा खुलासा; म्हणाली…
🛎️ MahaGenco अंतर्गत लवकरच 173 जागांसाठी भरती होणार;पात्रता काय पहा