हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladli Behna Yojana । लाडक्या बहिणींचा हप्ता आता २५० रुपयांनी वाढणार आहे, थेट मुख्यमंत्र्यांनीच याबाबत जाहीर घोषणा केली आहे. बातमी वाचून तुम्हालाही आनंद झाला असेल ना? पण जरा थांबा.. कारण हा हप्ता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी नाही, तर मध्य प्रदेशातील महिलांसाठी आहे. होय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी याबाबत थेट घोषणा केली आहे. येत्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व लाडली भगिनींच्या खात्यात १५०० रुपये हस्तांतरित केले जातील असं मोहन यादव यांनी म्हंटल आहे.
लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार ? Ladli Behna Yojana
मध्य प्रदेश सरकारने लाडली बहीण योजनेच्या (Ladli Behna Yojana) माध्यमातून महिलांना ३००० रुपये देण्याचे वचन दिले होते. त्या दृष्टीने आता सरकार पाऊल उचलत आहे. सुरुवातीला मध्य प्रदेश सरकारने महिलांना १००० रुपये दिले होते. त्यानंतर हे पैसे पाठवून १२५० करण्यात आले. आता या योजनेचा निधी आणखी २५० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांचं सरकार रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात अतिरिक्त २५० रुपये जमा करणार आहे. म्हणजेच काय तर मध्य प्रदेशातील महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. मध्य प्रदेशाबरोबरच बरेली प्रदेशाला छिंद वाले हनुमान जी महाराजांचे अपार आशीर्वाद आहेत. शेती समृद्ध बरेली प्रदेशही विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५ रुपयांत वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे सरकार पुढील ३ वर्षांत शेतकऱ्यांना वीज बिलातून पूर्णपणे मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे असं मोहन यादव यांनी म्हंटल.
महाराष्ट्रात कधी मिळणार २१०० रुपये-
दुसरीकडे महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील महिलांना सांगितलं होते कि पुन्हा एकदा आमचं सरकार निवडून द्या, आम्ही तुम्हाला १५०० ऐवजी २१०० रुपये दर महिन्याला देऊ, मात्र पुन्हा एकदा सत्तेत येऊन आणि नव्या सरकारला ७ महिने होऊनही अद्यापही लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. सरकार मधील एकही मंत्री २१०० रुपयांवर एका शब्दही काढत नाही. फक्त आम्ही लवकरच २१०० रुपये महिलांना देऊ अशी मोघम प्रतिक्रिया नेत्यांकडून दिली जात आहे.