Ladli Lakshmi Yojana | आपले सरकार हे महिला सक्षमीकरण करण्यासाठी नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात. मुलींना चांगले शिक्षण मिळावे महिलांना आर्थिक ज्ञान मिळावे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अनेक योजना आल्या जातात. अशातच आता मुलींचे शिक्षणासाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचे नाव लाडली लक्ष्मी योजना (Ladli Lakshmi Yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
मध्यप्रदेश सरकारने खास मुलींसाठी ही योजना आणलेली आहे. मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एक लाख 70 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत (Ladli Lakshmi Yojana) मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. या योजनेत मुलींना इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी 2 हजार रुपये दिले जातात. इयत्ता नववीमध्ये 4 हजार रुपये दिले जातात. अकरावीत गेल्यावर 6 हजार रुपये दिले जातात. तर बारावीत प्रवेश घेण्यासाठी 6 हजार रुपये दिले जातात.
मुलींना जर दहावी किंवा बारावी नंतर व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना प्रवेशासाठी 25 हजार रुपयांची मदत केली जाते. हे पैसे या मुलींना दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. अनेक मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे सरकारने ही नवी योजना आणलेली आहे. यानंतर मुलींचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून 1 लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाते. या योजनेत तुम्ही मुलीच्या नावानेच बँकेत खाते उघडू शकता. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर अर्ज करावी लागेल. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, बँकेचे कागदपत्र आणि फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.