Lakshadweep Tourism : जिवंतपणी स्वर्ग पहायचाय? तर देशातील ‘या’ सुंदर ठिकाणी जा; टेन्शन विसरून रिफ्रेश व्हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lakshadweep Tourism) रोजच्या दगदगीतून आणि धावपळीतून थोडासा निवांत वेळ काढून आपण कधीतरी एखादा फिरायचा प्लॅन करतो. त्यामुळे अशावेळी आपण एखाद्या सुंदर, नयनरम्य आणि शांत ठिकाणाचा शोध घेत असतो. पण शहराच्या गजबजाटात शांत निवांत ठिकाण मिळणे जरा कठीणच! त्यामुळे बरेच लोक मालदीव, बाली यांसारख्या सुंदर ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतात. या ठिकाणी आपण आपल्या पार्टनरसोबत किंवा फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम घालवू शकतो. शिवाय निसर्ग सौंदर्य इतके कमाल की, कुणीही हरवून जाईल.

पण मालदीव आणि बालीपेक्षाही सुंदर.. पृथ्वीवर स्वर्ग असल्याचे भासेल अशा ठिकाणाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हे ठिकाण म्हणजे लक्षद्वीप. देशातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून लक्षद्वीप ओळखले जाते. (Lakshadweep Tourism) इथे जाणारा पर्यटक पुन्हा मालदीव आणि बालीला जायचा विचारसुद्धा करत नाही. कारण लक्षद्वीपमध्ये फिरण्यासारखी इतकी सुंदर ठिकाणे आहेत. जी आपल्या मनाला नवी चेतना आणि ऊर्जा देऊ शकतात. चला तर लक्षद्वीपमधील सर्वात सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण ठिकाणांविषयी जाणून घेऊया.

नयनरम्य लक्षद्वीप

लक्षद्वीप हा अरबी समुद्रातील ३६ बेटांचा समूह आहे, जो भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले एक अत्यंत सुंदर, शांत आणि रोमॅंटिक डेस्टिनेशन म्हणून लक्षद्वीप प्रसिद्ध आहे. (Lakshadweep Tourism) त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. अनेक लोक या ठिकाणी केवळ मन शांत करण्यासाठी येतात. तर या ठिकाणी बरेच कपल्स हनिमूनसाठी येतात. लक्षद्वीपमध्ये फिरण्यासारखी आणि पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी प्रसिद्ध ठिकाणांची आज आपण माहिती घेत आहोत.

लक्षद्वीपमधील प्रसिद्ध ठिकाणे (Lakshadweep Tourism)

लक्षद्वीपमध्ये कल्पेनी बेट, कदमत बेट, अगत्ती बेट आणि बांगरम बेट ही अत्यंत प्रसिद्ध बेटे मानली जातात. (Lakshadweep Tourism) त्यामुळे या बेटांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. तसेच कावरत्ती बेट हे लक्षद्वीपची राजधानी असून येथे वॉटर स्पोर्ट्ससाठी मोठी गर्दी असते. तर मिनिकॉय बेट हे लक्षद्वीपच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक मानले जाते. जिथे अनेक लक्झरी रिसॉर्ट्स आहेत.

लक्षद्विपची लोकसंख्या

लक्षद्वीप हा भारताचा एक छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. जो भारतापासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात स्थित आहे. एकूण ३६ बेटांचा समूह असलेला लक्षद्वीप ८ किमी परिसरात पसरलेला आहे. (Lakshadweep Tourism) येथील लोकसंख्या सुमारे ८ हजारच्या आसपास आहे. येथील लोकांचे पोट हे इथल्या पर्यटनावर आधारित आहे.