Land Allotment Calculation Fee : फक्त 200 रुपयांत होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी; सरकारचा मोठा निर्णय

Land Allotment Calculation Fee
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. इथून पुढे राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी (Land Allotment Calculation) अवघ्या 200 रुपयांत होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. खरं तर शेतजमिनीचा वाद हा काही नवा नाही.अनेकदा जमिनीच्या सीमांवरून वाद निर्माण होतात, त्यानंतर शेवटचा उपाय म्हणून हिस्सेवाटप मोजणी केली जाते. यापूर्वी जमिनींची हिस्सेवाटप मोजणी करण्यासाठी 1000 ते 4000 रुपये प्रति हिस्सा असे शुल्क आकारण्यात येत होते, मात्र आता हेच शुल्क अवघ्या 200 रुपयावर करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे, त्याच्या पैशाची बचत होणार आहे.

सरकारचा निर्णय नेमका काय?

जमीन मोजणी ही शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. जमिनीच्या सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी आवश्यक असते. यापूर्वी हि मोजणी करण्यासाठी शेतकऱ्याना जास्तीचे पैसे खर्च करावे लागायचे,हे शुल्क जवळपास १००० ते ४००० रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येत होते. मात्र आता फक्त २०० रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे. अनेकदा जमिनींची हिस्सेवाटप मोजणी खर्चामुळे कुटुंबात तणावाची परिस्तिथी निर्माण होते. २-३ भाऊ असतील तर हे शुल्क भरायचे कोणी? यावरून वाद होतात. मात्र आता फक्त २०० रुपये भरायचे असल्याने अशा प्रकारचे कोणतेही वाद होण्याची शक्यता कमी आहे. एकूणच काय तर सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

फक्त 2 मिनिटात मोजा तुमची शेतजमीन- Jamin Mojani

शेतकऱ्यांनो, तुम्हाला अगदी फुकट मध्ये आणि फक्त २ मिनिटात तुमची शेतजमीन मोजायची असेल तर चिंता करू नका.. हॅलो कृषी या मोबाईल अँप वरून तुम्ही फक्त २ मिनिटात तुमची जमीन मोजू शकता. त्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. तुम्ही आहे त्या जागेवरूनच मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ मोजू शकता. त्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

1) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जावा आणि तिथे Hello Krushi असं सर्च करून ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link :https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी हे अँप Install झाल्यांनतर सर्वात अगोदर त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक माहिती टाका .

3) त्यानंतर तुम्हाला ‘हॅलो कृषी’ चे होम पेज दिसले. त्यावरील जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा

4) क्लीक करताच आत्ता तुम्ही कुठे उभे आहात ते लोकेशन तुम्हांला सॅटेलाईटच्या मदतीने दिसेल.

5 ) आता तुमची शेतजमीन नेमकी किती भरतोय हे पाहण्यासाठी डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा. ( हेक्तर, एकर चौरस मीटर, चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.

6 ) आता तुम्हांला जी जमीन मोजायची त्याचे एक – एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.

7 ) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.

8) त्यांनतर तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याचा अचूक आकडा तुम्हाला दिसेल.

शेतकरी मित्रांनो, हॅलो कृषीवर फक्त जमीनच मोजता (Jamin Mojani) येत नाही तर शेतीशी संबंधित अनेक सोयी – सुविधा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो कृषीमध्ये तुम्हाला सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ले, रोजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी थेट अर्ज, यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ मिळतोय. तसेच तुम्हाला रोपे खरेदी करता येतील… तुमच्या प्राण्यांची कोणत्याही एजंट शिवाय खरेदी- विक्रीही करता येईल. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्यासाठी आजच हॅलो कृषी हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा.