Land Measurement : मिनिटांत मोजा तुमची एकरभर शेतजमीन; आजच मोबाईल मध्ये घ्या ‘हे’ App

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Land Measurement । मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश मानला जातो. देशातील शेतकरी म्हणजेच बळीराजाचं खऱ्या अर्थाने या देशाचा पोशिंदा आहे. देशातील अनेकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. परंतु मित्रानो, शेती म्हंटल की त्याच्या जागेवरून वाद हे आलेच. तुझी सरी माझ्या हद्दीत आली किंवा माझा बांध तू रेटला अशा कारणावरून अनेकदा सक्ख्या शेजाऱ्यांमध्ये भांडण झाल्याचे आपण ऐकलं असेल किंवा प्रत्यक्षात बघितलं पण असेल. अशावेळी सरकारी मोजणी बोलावण्याचा विचार केला तर त्यासाठी आपला वेळही जातो आणि महत्त्वाचे म्हणजे आपले पैसेही खर्च होतात. परंतु आत चिंता करू नका. कारण यावर उपाय काढण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविधा घेऊन आलो आहोत. ती सुविधा म्हणजे Hello Krushi मोबाईल अँप….

बळीराजाचे जीवनमान सोप्प व्हावं, शेती करत असताना त्याला जास्त त्रास होऊन नये, त्याच काम हलकं व्हावं यासाठीच Hello Krushi अँप तयार करण्यात आलं आहे. या अँपच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेतजमीन, (Land Measurement) कोणतेही मैदान किंवा कंपाऊंडची मोजणी अगदी  फुकट मध्ये आणि अवघ्या काही मिनिटात मोजू शकता. तसेच या सुविधेमुळे जर तुम्ही शेतात रोपे लावण्याचा विचार करत असल्यास तर जमिनीच्या लांबी-रुंदी नुसार नेमकी किती रोपे लागतील याचाही अचूक अंदाज तुम्हाला हॅलो कृषी मधून मिळणार आहे. एवढंच नव्हे तर हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही सातबारा उतारा, हवामान अंदाज, सरकारी योजनांना अर्ज करणे, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi अँप वरून अशाप्रकारे मोजा तुमची जमीन-  Land Measurement

1) सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जावा आणि तिथे Hello Krushi असं सर्च करून ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link :https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी हे अँप Install झाल्यांनतर सर्वप्रथम त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक माहिती टाका .

3) त्यानंतर तुम्हाला ‘हॅलो कृषी’ चे होम पेज दिसले. त्यावरील जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा

4) यानंतर आत्ता तुम्ही कुठे उभे आहात ते लोकेशन तुम्हांला सॅटेलाईटच्या मदतीने दिसेल.

5 ) आता तुमची शेतजमीन नेमकी किती भरतेय हे पाहण्यासाठी डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा. ( हेक्तर, एकर चौरस मीटर, चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.

6 ) आता तुम्हांला तुमची जी कोणती जमीन मोजायची (Land Measurement)त्याचे एक – एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा

7 ) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.

8) आता तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफळ आणि लांबी किती आहे याचा अचूक आकडा तुम्हाला खाली दिसेल. आणि तुमची जमीन नेमकी किती भरत आहे याचा अंदाज तुम्हाला येईल.

शेतकरी मित्रांनो, हॅलो कृषीवर फक्त जमीनच मोजता  येत नाही तर शेतीशी संबंधित अनेक सोयी – सुविधा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो कृषीमध्ये तुम्हाला रोजचा सर्व पिकांचा बाजारभाव, सातबारा उतारा, फेरफार उतारा, वारस नोंदणी, शेतीविषयक सल्ले, रोजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी थेट अर्ज,यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ मिळतोय. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही.

हॅलो कृषीमध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा मिळतात त्या आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगतो.

१ ) हॅलो कृषीच्या माध्यमातून सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज अचूकपणे कळतो.

2) हॅलो कृषिवरून शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर मोबाइलवरूनच अर्ज करता येतो आणि त्याचा आर्थिक फायदा घेता येतो.

3) तुम्हाला तुमची शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने अगदी 2 मिनिटात मोजता येते.

4) महाराष्ट्रातील सर्व बाजारसमित्यांमधील शेतमालाचा बाजारभाव एका क्लीक मध्ये समजतो.

5) हॅलो कृषीच्या माध्यमातून अगदी काही मिनिटात सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भू- नकाशा काढता येतो.

6 ) शेतीशी निगडित जुनी वाहने, जनावरे, तसेच शेतजमीन यांची कोणत्याही एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.

7) तुमच्या आसपास असलेल्या सर्व रोपवाटिका, कृषी केंद्र, खत दुकानदार यांच्याशी थेट संपर्क साधता येतोय.

8) तुम्ही पिकलवेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता येतो.