Land Record : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 90 सेकंदात जमीन मोजणी, 7/12 उतारा मिळणार…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारत देश हा कृषिप्रधान देश असून देशातील बहुतांश लोकांचं जीवनमान हे शेतीवर अवलंबवून आहे. देशातील शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने पीक घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला याचा मर्यादित फायदा होतो. शेती करत असताना शेतकऱ्याला चांगला फायदा व्हावा आणि यासोबतच त्याचे कष्ट आणि मेहनत सुद्धा कमी व्हावी यासाठी Hello Krushi ने पुढाकार घेतला आहे. हॅलो कृषी ही एक शेतकऱ्यांसाठी काम करणारी चळवळ आहे.

हॅलो कृषी हे एक मोबाईल अँप असून शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन आणि त्याला मोफत मध्ये सोयी- सुविधा देण्यासाठी बनवण्यात आलं आहे. हॅलो कृषी मधील तंत्रज्ञानामुळे सेटेलाईटच्या माध्यमातून केवळ 90 सेकंदात जमीन मोजणी (Land Record) करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही सरकारी मोजणी मागवली तर तुमचा वेळ आणि खर्च दोन्हीही जातो, परंतु हॅलो कृषी अँप मधून तुम्ही अगदी फुकट मध्ये तुमची शेतजमीन मोजू शकता.

हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतीला लागणारा खर्च कमी होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. दररोज बदलणारे हवामान अंदाज, शेतीतील माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे, कमी खर्च अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या पिकांची लागवड, विविध तंत्रज्ञानाचा वापर करून हॅलो कृषीने शेतकर्‍यांसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांची जनजागृती व्हावी आणि कमी खर्चात शेतीचे योग्य नियोजन व्हावं, यादृष्टीने हॅलो कृषीच्या माध्यमातून मोफत जमीन मोजणी करुन दिली जात आहे.

यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे सातबारा उतारा…. शेतीसंबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सातबारा उतारा लागतोच. त्यासाठी सरकारी कार्यलयात चकरा मारण्यापेक्षा हॅलो कृषीवर जाऊन मोफत मध्ये तुम्ही तुमचा सातबारा उतारा काढू शकता. आणि तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचवू शकता. सोबतच हॅलो कृषी मध्ये माती परीक्षण, पीक दिनदर्शिका, कीड आणि रोग शोधणे, कृषी तंत्रज्ञानाचा सल्ला, शेतकरी दुकान, बाजार भाव याची माहिती देण्यात येत आहे.

याशिवाय हॅलो कृषी मध्ये सरकारी योजनांचा लाभ, हवामान अंदाज, फळांची आणि तुमच्या शेतमालाची थेट खरेदी विक्री, भाडेतत्वावर सेवा, पशूंची खरेदी- विक्री तुम्ही करू शकता. तसेच तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, कृषी केंद्रे, खत दुकानदार यांच्याशी थेट कॉन्टॅक्ट साधू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन Hello Krushi हे अॅप तुम्हाला डाऊनलोड करुन घ्यायचे आहे.