हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या Vodafone Idea कंपनी चांगली ग्रोथ करताना दिसत आहे. कारण या कंपनीने आता Reliance jio आणि Airtel नंतर तिसऱ्या स्थानावर येण्याचा मान मिळवला आहे. खास गोष्ट म्हणजे, आता हीच कंपनी लवकर आपला FPO लाँच करणार आहे. यामार्फत कंपनीने 18,000-20,000 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. व्होडाफोन आयडियाचा हा FPO 18 एप्रिलला उघडेल आणि 22 एप्रिलला करेल. यासह अँकर गुंतवणूकदार ऑफर 16 एप्रिल रोजी मंजूर करेल.
ब्रँड किंमत
Vodafone Idea Ltd ने त्यांच्या FPO साठी प्रति शेअर साठी 10 आणि 11 च्या दरम्यान बँड सेट केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार किमान 1,298 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. FPO मधील एका लॉट शेअर्ससाठी प्राइस बँडच्या सर्वात वरील अर्जाची किमान रक्कम 14,278 रुपये असेल. यानंतर गुंतवणूकदार 1,298 इक्विटी शेअर्सच्या पटीमध्ये बोली लावू शकतात. याव्यतिरिक्त, व्होडाफोन आयडिया कंपनी कर्ज निधीसाठी बँकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे.
FPO मागील योजना
एक्सचेंज फाइलिंगने माहिती दिली आहे की, बोर्डाने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) विकत घेण्यास आणि रजिस्ट्रार ऑफ कंपनी गुजरातसोबत दाखल करण्यास मान्यता दिली आहे. यात Vodafone Idea 15 एप्रिलपासून ऑफर संपेपर्यंत रोड शोमध्ये सहभागी होईल. तसेच, गुंतवणूकदार/विश्लेषकांशी संवाद साधेल. दरम्यान, व्होडाफोन आयडिया कंपनी कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये कंपनीने FPO आणण्याचा निर्णय 27 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या बोर्डाने इक्विटीद्वारे 20,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिल्यानंतर घेण्यात आला आहे.