मुंबई : खातेवाटप झाल्यानंतर आज पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली. जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पालकमंत्री हे महत्वाचे पद असते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिवंगत नेते आर.आर. पाटील यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद आघाडी सरकार असताना भूषविले होते.पुण्याचे पालकमंत्री पद पुन्हा अजित पवार यांच्याकडे आले आहे. अहमदनगरचे पालकमंत्री पद कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे तर कोल्हापुरचे पालकमंत्री पद नगरच्या बाळासाहेब थोरातांना देण्यात आले आहे.
पुणे- अजित अनंतराव पवार
मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
रायगड – आदिती सुनिल तटकरे
रत्नागिरी- ॲड.अनिल दत्तात्रय परब
सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
पालघर- दादाजी दगडू भुसे
नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
धुळे- अब्दुल नबी सत्तार
नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
सांगली- जयंत राजाराम पाटील
सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
जालना- राजेश अंकुशराव टोपे
परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
बीड- धनंजय पंडितराव मुंडे
नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
लातूर- अमित विलासराव देशमुख
अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे