माझा पक्ष सोडून सर्वच पक्षात घराणेशाही – रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साताऱ्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी राजकीय फटकेबाजी केली.माझा पक्ष सोडून सर्व पक्षात घराणेशाही आहे असे मत आठवले यांनी यावेळेस व्यक्त केले. त्यांनी आपल्या खास शैलीत कविता देखील सादर केली. त्यांनी म्हंटले की, मी नाही नाराज म्हणून साताऱ्यात आलोय आज. आठवले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे फार काळ टिकणार नाही.

‘महामंडळ गेलं आणि मंत्रीपदही गेलं’

रामदास आठवले यांनी म्हंटले की, घराणेशाही सगळ्या पक्षामध्ये आहे. फक्त माझ्या पक्षात घराणेशाही नाही. भाजपचं सरकार आलं असतं तर आरपीआयच्या कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळाली असती. पण सगळं महामंडळ गेलं आणि मंत्रीपदही गेलं. राजकारणामध्ये असे प्रसंग येत असतात. भाजपने तीन वर्षे आणि शिवसेनेने दोन वर्षे अशा पद्धतीचा प्रस्ताव मी मांडला होता. पण माझ्या या प्रस्तावाला पाठींबा काही मिळाला नाही. त्यामुळे हा पर्याय आज उभा राहिला आहे.

Leave a Comment