समोर बसलेले लोक मुर्ख आहेत असं समजून भाषण करायचो पण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण कौशल्य महाराष्ट्राला चांगलेच ज्ञात आहे. विधानसभा निवडणुकितही देवेंद्र फडणवीस यांनी सभा गाजवत जोरदार बँटींग केल्याने भाजपच्या सर्वाधिक जागा निवडुन आल्या. फडणवीस यांचा मी पुन्हा येईन हा डायलाॅग तर अजूनही सोशल मिडियावर ट्रेंडिंगला आहे. मात्र फडणवीसांकडे असे वक्तृत्व कौशल्य कसे आले यावर आता खुद्द फडणवीस यांनीच भाष्य केले आहे.

जगातले सगळे मुर्ख लोक आपल्या समोर बसलेले आहेत. जगात आपल्यापेक्षा हुशार कोणी नाही. असं समजून भाषण करण्याचा कानमंत्र मला लहानपणी मिळाला होता असा उलगडा फडणवीस यांनी केला आहे. पुणे येथे मोरया युथ फेस्टिवल मध्ये फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या जीवणातील अनेक बाबींवर भाष्य केले.

समोर बसलेले लोक मुर्ख आहेत असं समजून भाषण करायचो पण.

शालेय जीवणात मी शांत स्वभावाचा विद्यार्थी होतो. भाषण करण्यात मी तरबेज नव्हतो. एकदा मित्रासोबत डिबेटला गेलो आणि त्यानंतर भाषण करु लागलो. त्यावेळी एक जणाने मला सांगितलं जर स्टेजची भिती वाटत असेल तर जगातले सगळे मुर्ख लोक आपल्या समोर बसलेले आहेत. जगात आपल्यापेक्षा हुशार कोणी नाही असं समजून भाषण करायचं. मी त्याचं ऐकलं आणि भाषण केलं. तेव्हा मला पहिला पुरस्कार मिळाला. असं फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस यांनी मुलाखतीत मनमोकळी उत्तरे दिल्याने त्याचे कौतुक होत आहे. अजूनही भाषणाचा फोर्मुला तोच आहे का असं सुत्रसंचालकाने विचारले असता आता मी ते विसरलो आहे असं फडणवीस म्हणाले. आता माझ्या लक्षात आलं आहे की जगातले सर्वात मुर्ख आपणच असतो असं फडणवीस म्हणाल्यावर सभागृहात चांगलाच हसा पिकला.

Leave a Comment