मोस्ट अवेटेड Honda इलेक्ट्रिक स्कूटर ‘या’ तारखेला होणार लॉन्च ; नवा टिझर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानची दोन चाकी वाहन निर्माता कंपनी Honda Motorcycle and Scooter India (HMSI) लवकरच भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. कंपनीकडून लाँच होणारी हि स्कूटर Honda Activa Electric या नावाने ओळखली जाणार आहे. लाँचपूर्वी या स्कूटरचा एक नवीन टीझर सोशल मीडियावर वारंवार दाखवला जात असून , यामध्ये चार्जिंग पोर्टची माहिती देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊयात या इलेक्ट्रिक स्कूटर खासियत .

Honda Activa Electric –

Honda ने याआधी Activa Electric स्कूटरसाठी चार टीझर सादर केले होते. त्यामध्ये स्कूटरच्या मोटर, दोन डिजिटल स्पीडोमीटर, एलईडी लाईट्स, रेंज, ड्रायव्हिंग मोड्स, आणि रिमूवेबल बॅटरी यांसारख्या वैशिष्ट्यांचा उल्लेख होता. नवीन टीझरमध्ये चार्जिंग पोर्टची झलक दाखवण्यात आली आहे. यामुळे अनेक ग्राहक याच्या लाँचिंगसाठी उत्सुकत आहेत. तसेच या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एलईडी हेडलाइट्स आणि ड्रायव्हिंगसाठी दोन मोड्स असणार आहेत.

27 नोव्हेंबरला लाँच –

Honda Activa Electric भारतीय बाजारात 27 नोव्हेंबर 2024 रोजी लाँच होणार आहे. या स्कूटरसोबत कंपनी इतर इलेक्ट्रिक वाहनही सादर करू शकते. पण कोणत्या सेगमेंटमधील वाहन लाँच केले जाईल, याबाबत कंपनीने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. भारतीय बाजारात Honda Activa Electric ची थेट स्पर्धा हि मोठया कंपन्यांशी होणार आहे. त्यामध्ये Ola Electric, Ather, Vida, TVS iQube, आणि Bajaj Chetak यांसारख्याचा समावेश असणार आहे . ही स्कूटर्स सध्या बाजारात लोकप्रिय असून Honda च्या Activa Electric स्कूटरला चांगले प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

किंमत –

होंडा Activa Electric स्कूटरची किंमत आणि इतर माहिती लाँच दरम्यान समजणार आहे. हि इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात लाँच झाल्यानंतर मार्केटमध्ये अजून एका गाडीची भर पडणार आहे. त्यामुळे बाजारातील स्पर्धा वाढू शकते.