लातूर: कोरोना काळात रिक्षा चालक, बँक कर्मचारी, किराणा व मेडिकल दुकानदार तसेच वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी हे सातत्याने लॉकडाऊनमध्ये सुद्धा काम करत होते. त्यांना फ्रीन्ट लाईन वोर्करचा दर्जा देत लातूर महानगरपालिकेने लसीकरणाचे निर्णय घेतला आहे. या निर्णयाची सर्व स्थरातून प्रशंसा होत आहे.
कोरोनाच्या काळात तसेच लॉकडाऊन असतांना देखील शहरामधील ऑटोरिक्षा चालक, बँक कर्मचारी, मेडीकल दुकानदार, किराणा दुकानदार तसेच घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी यांचा लोकांशी अधिक संपर्क येतो. त्यामुळे उपरोक्त व्यावसायिक व कर्मचारी यांचा दररोज अनेक व्यक्तींशी संपर्क येतो. त्यामुळे व्यावसायिक व कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करुन त्यांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करुन घेण्याचा निर्णय लातूर महानगरपालिकेने घेतलेला आहे.
या सर्व कर्मचाऱ्याच्या लसीकरणसाठी त्यांच्या संघटने मार्फत मिळालेल्या ‘फ्रीन्ट लाईन वर्कर’ प्रमाणपत्र घेऊन. महानगरपालिकेत ते प्रमाणपत्र दाखवून सर्वच बँक कर्मचारी, रिक्षा चालक, मेडिकल आणि किराणा दुकानदार व वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी यांना लस देणार आहेत. या लसीकरणासाठी सदरील पुराव्यांसोबत लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे आवाहन लातूर मनपा कडून करण्यात येत आहे.