सातारा जिल्ह्यात फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या न्यायालय आपल्या दारी या योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये फिरते लोकन्यायालयाच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आले.

या प्रसंगी मुख्यालयातील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकील आणि कर्मचारी उपस्थित होते. या फिरत्या न्यायालयाचे कामकाज निवृत्त न्यायाधीश भारत खटावकर हे पाहणार आहेत. या न्यायालयाचे कामकाज दि. 4 जुलै ते 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुढील ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

दि. 4 व 5 जुलै 2022 रोजी मेढा, दि. 6 व 7 जुलै महाबळेश्वर, दि. 8, 11 व 12 जुलै वाई, दि. 13 व 14 जुलै खंडाळा, दि. 15,16 व 18 जुलै फलटण, दि. 19 व 20 जुलै दहिवडी, दि. 21 व 22 जुलै म्हसवड, दि. 25,26 व 27 जुलै वडुज, दि. 28, 29 व 30 जुलै कोरेगांव, दि. 1 व 2 ऑगस्ट पाटण, दि. 3,4, 5 व 6 ऑगस्ट 2022 रोजी कराड या तालुक्यांत फिरते लोकन्यायालयाचे मोबाईल व्हॅन जाणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली करण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.