Lava Bold 5G : अवघ्या 10,499 रुपयांत मिळतोय कर्व्ड AMOLED डिस्प्ले वाला मोबाईल

Lava Bold 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी LAVA ने स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. Lava Bold 5G असं या नव्या मोबाईलचे नाव असून यामध्ये 64MP कॅमेरा, ५०००mAh बॅटरी सारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलचा डिस्प्ले सुद्धा AMOLED टाईप आहे, ज्यामुळे मोबाईलचा लूक आणखीच छान दिसतोय. लावा चा हा मोबाईल ८ एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घेऊयात….

६.६७ इंचाचा डिस्प्ले –

Lava Bold 5G मध्ये कंपनीने १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले बसवला आहे. हा डिस्प्ले पंच होल कटआउटसह येतो. कंपनीने मोबाईल मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर दिला असून त्यानुसार, हा स्मार्टफोन ४ जीबी, ६ जीबी आणि ८ जीबी रॅमसह येतो. लावाचा हा मोबाईल Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा – Lava Bold 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Lava Bold 5G मध्ये 64MP सोनीचा मुख्य कॅमेरा मिळतो, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला १६ MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये ५०००mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी ३३W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. लावा च्या या स्मार्टफोनला IP64 रेटिंग देण्यात आलं आहे. जे धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला संरक्षण देते.

किंमत किती?

Lava Bold 5G च्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, अवघ्या १०,४९९ रुपयांपासून त्याची बेस प्राईस सुरू होते. हा हँडसेट ८ एप्रिलपासून प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. लावा चा हा मोबाईल सॅफायर ब्लू रंगात लाँच करण्यात आला आहे. बाजारात हा मोबाईल Realme, Redmi, Infinix आणि इतर ब्रँडच्या मोबाईलला टक्कर देईल.