Lava O2 : फक्त 7999 रुपयांत लाँच झाला 8GB रॅम वाला मोबाईल

Lava O2 launch
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड लावा नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त मोबाईल बाजारात आणत असते. मध्यमवर्गीय ग्राहकाला सुद्धा परवडणाऱ्या किमतीत मोबाईल विकत घेता यावा यासाठी कंपनी सातत्याने नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. आताही कंपनीने Lava O2 नावाचा एक नवा मोबाईल लाँच केला आहे. तब्बल 8GB रॅमची सुविधा असलेला हा मोबाईल तुम्ही अवघ्या 7999 रुपयांत खरेदी करू शकता. आज आपण या स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेले खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

6.5-इंचाचा डिस्प्ले –

Lava O2 मध्ये कंपनीने 90hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 720×1600 पिक्सेल रिझोल्युशनला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर UNISOC T616 प्रोसेसर बसवला असून व्हॅनिला अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमवर हा मोबाईल वर्क करतो. सिक्युरिटी साठी स्मार्टफोन मध्ये डिव्हाइमध्ये फेस अनलॉक सुविधा देण्यात आली आहे.

कॅमेरा – Lava O2

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, Lava O2 मध्ये पाठीमागील बाजूला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये AI सपोर्ट सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी लावाच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. किंमत कमी असूनही मोबाईलला 8GB RAM आणि128GB स्टोरेज देण्यात आले आहे.

येत्या 27 मार्चपासून या मोबाईल खरेदीसाठी बुकिंगला सुरुवात होणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon आणि Lava e-store वरून खरेदी करू शकता. इंपीरियल ग्रीन, मजिस्टिक पर्पल आणि रॉयल गोल्ड अश्या तीन कलर ऑप्शनमध्ये हा मोबाईल उपलब्ध आहे.