हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मोबाईल निर्माता ब्रँड Lava ने ग्राहकांना परवडेल अशा स्वस्तात मस्त किमतीत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Lava Shark असं या मोबाईलचे नाव असून या स्मार्टफोनची किंमत अवघी ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.. किंमत जरी कमी असली तरी यात भलामोठा डिस्प्ले, ५०-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी यांसारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण Lava Shark चे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात….
Lava Shark मध्ये ६.६७ इंचाचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल असलेला हा डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सह येत असून त्यात ७२० x १६१२ पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. लावा च्या या मोबाईल मध्ये युनिसॉक प्रोसेसर T606 प्रोसेसर बसवण्यात आलाय. हा स्मार्टफोन 4GB रॅमसह येत असून त्यात ४ जीबी व्हर्च्युअल रॅम चा सपोर्ट मिळतोय. मोबाईल मध्ये ६४ जीबी स्टोरेज देण्यात आलं असून एसडी कार्डच्या मदतीने ते २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकत. लावा चा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यामध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा देखील देण्यात आली आहे
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, लावा शार्कमध्ये ५०-मेगापिक्सेलचा मुख्य AI रियर कॅमेरा आहे. यासोबत LED फ्लॅश देखील उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी कॅमेरा अॅपमध्ये एआय मोड, पोर्ट्रेट मोड, प्रो मोड आणि एचडीआर इत्यादी सुविधा दिल्या आहेत. सेल्फी आणि विडिओ कॉल साठी लावा च्या या नव्या मोबाईल मध्ये ८-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो एलईडी फ्लॅश देत नाही परंतु स्क्रीन फ्लॅश देतो. लावा शार्कमध्ये ५ हजार एमएएच बॅटरी बसवण्यात आली आहे. हि बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
आता येऊया मूळ मुद्द्यावर, ते म्हणजे मोबाईलच्या किमतीवर….. तर लावा शार्कची किंमत ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन टायटॅनियम गोल्ड आणि स्टील्थ ब्लॅक रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तुम्ही लावा रिटेल स्टोअरमधून हा मोबाईल खरेदी करू शकता.
लावा शार्कमध्ये ५ हजार एमएएच बॅटरी आहे. हे १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तथापि, कंपनी बॉक्समध्ये फक्त १० वॅटचा चार्जर देत आहे. हा फोन अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यामध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा देखील देण्यात आली आहे.