Lava Yuva Star 2 : फक्त 6499 रुपयांत मिळतोय 8GB रॅम वाला मोबाईल

Lava Yuva Star 2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर स्वस्तात मस्त आणि कमी पैशात मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध मोबाईल निर्माता ब्रँड LAVA ने भारतीय बाजारात ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Lava Yuva Star 2 असं या मोबाईलचे नाव असून या हॅण्डसेटची किंमत अवघी 6499 रुपये आहे. महत्वाची बाब म्हणजे या मोबाईल मध्ये 4GB मुख्य रॅम आणि 4GB वर्चुअल रॅम अशी एकूण 8GB रॅम देण्यात आली आहे. आज आपण लावाच्या या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेणार आहोत.

६.७५-इंचाचा डिस्प्ले –

Lava Yuva Star 2 मध्ये ६.७५-इंचाचा HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी स्क्रीनवर वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे. मोबाईल मध्ये ऑक्टा-कोर UNISOC प्रोसेसर बसवण्यात आला असून लावा चा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ गो वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. अँड्रॉइड १४ गो ही अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमचे लाइटवेट व्हर्जन आहे, जी विशेषतः कमी हार्डवेअर क्षमता असलेल्या एंट्री-लेव्हल स्मार्टफोनसाठी डिझाइन केलेली आहे. मोबाईल मध्ये 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. परंतु वर्चुअल रॅम द्वारे तुम्ही हीच रॅम 8 GB पर्यंत वाढवू शकता.

कॅमेरा – Lava Yuva Star 2

मोबाईलच्या कॅमेरा सेटअप बाबत सांगायच झाल्यास, Lava Yuva Star 2 मध्ये पाठीमागील बाजूला १३ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा बसवण्यात आला आहे तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोर ५ मेगापिक्सेल चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये ५,००० mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी १०W वायर्ड चार्जरला सपोर्ट करते. सेक्युरिटी साठी स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर आहे.

किंमत-

जस आम्ही सांगितलं कि या मोबाईल ची किंमत फक्त ६,४९९ रुपये आहे. हा मोबाईल काही निवडक रिटेल आउटलेटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक रेडियंट ब्लॅक आणि स्पार्कलिंग आयव्हरी रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.