Lava Yuva Star 4G : अवघ्या 6,499 रुपयांत लाँच झाला स्वस्तात मस्त Mobile; AI कॅमेरासह मिळतात भन्नाट फीचर्स

Lava Yuva Star 4G launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईलशिवाय कोणाचं पानही हलत नाही. मोबाईलच्या माध्यमातून आपलं मनोरंजन तर होतेच, मात्र आपली अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरच होतात. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतोच. मात्र मोबाईल खरेदी करत असताना स्वस्तात मस्त आणि कमी पैशात खरेदी करण्याकडे सर्वसामान्य ग्राहकांचा कल असतो. तुम्ही सुद्धा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका अतिशय कमी किमतीत उपलब्ध असलेल्या मोबाईल बद्दल सांगणार आहोत. Lava Yuva Star 4G असे या नव्या स्मार्टफोनचे नाव असून नुकताच या मोबाईल अवघ्या 6,499 रुपयांत लाँच झाला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात….

डिस्प्ले –

Lava Yuva Star 4G मध्ये 6.75-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मोबाईल दिसायला अतिशय आकर्षक असा आहे. स्मार्टफोनमध्ये UNISOC 9863A चिपसेट वापरण्यात आली असून लावाचा हा मोबाईल Android 14 Go ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. मोबाईलमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आलं असून वर्चुअल रॅमद्वारे हि रॅम आणखी 4GB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा – Lava Yuva Star 4G

मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, Lava Yuva Star 4G मध्ये पाठीमागील बाजूला 13 मेगापिक्सलचा डुअल AI कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये एआय, एचडीआर आणि पॅनोरामासह विविध शूटिंग मोड मिळतात. त्यामुळे फोटोग्राफी करताना यूजर्सना चांगला अनुभव येतो. पॉवरसाठी लावाच्या या स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी असून हि बॅटरी 10 वॅट चार्जरला सपोर्ट करते.

किंमत किती?

Lava Yuva Star 4G स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज अंतर्गत येतो. देशातील सर्व मोबाईल स्टोअर्सवर लावाचा हा नवा स्मार्टफोन उपलब्ध असून ग्राहक काळ्या, पांढऱ्या आणि जांभळ्या रंगात खरेदी करू शकतात.