Lavasa Landslide : लवासामध्ये दरड कोसळली; 3-4 जण अडकल्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे लवासामध्ये असलेल्या दोन व्हिलांवर दरड कोसळल्याची (Lavasa Landslide) घटना घडली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे दोन्ही व्हिला गाडले गेले आहेत. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे. मागच्या वर्षी ईशराळवाडी येथेही अशीच भूस्खलनाची घटना घडली होती.

काही नागरिक अडकल्याची भीती – Lavasa Landslide

पुण्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार आणि धुव्वाधार पाऊस सुरु आहे. आजही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. संपूर्ण पुणे शहराला समुद्राचं रूप आलं आहे. रेस्क्यू करून नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यात लवासात भूस्खलन होऊन दरड (Lavasa Landslide) कोसळली. पुनर्वसित अशा रामनगरमध्ये दरड कोसळली. लवासातल्या काही बंगल्यांवर दरड कोसळल्याची माहिती आहे. या दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची माहिती आहे. तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत असं असलं तरी लवासा या ठिकाणी अजून पर्यंत प्रशासनाची कुठलीही मदत पोहचली नाही आहे.

प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा हाहाकार आणि पूरस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच काही कामानिमित्तच घराबाहेर पद अन्यथा घरीच बस असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.