हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे विद्यार्थी CET (Common Entrance Test for Law) परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी परीक्षेच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे. आता शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु असून , अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यातच यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET) कक्षाकडून घेण्यात येणारी कायद्याच्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा यावर्षीपासून सामाईक विधि प्रवेश परीक्षेच्याद्वारे (Common Law Entrance Test – CLAT ) घेण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी 150 गुणांची असलेली परीक्षा आता 120 गुणांची होणार आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सीईटी पेपरच्या संरचनेत बदल –
विधी शाखेच्या ( Law ) 3 वर्षे आणि 5 वर्षे कालावधी असलेल्या अभ्यासक्रमांच्या सीईटी पेपरच्या संरचनेत बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी 150 गुणांची असलेली परीक्षा आता 120 गुणांसाठी घेतली जाणार आहे , पण अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यस्तरावर सीईटी परीक्षांचे आयोजन सीईटी सेलतर्फे केले जात आहे. या बदलानंतर सीईटी परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि मार्चपासून टप्प्याटप्याने परीक्षा घेण्यात येणार आहेत. विधी शाखेतील एलएल.बी. पदवी अभ्यासक्रमात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे, तर पदवीधारकांसाठी तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम आहे.
सीईटी परीक्षेची संरचना –
तीन वर्षे कालावधीच्या एलएल.बी. साठी –
कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर तर्क – 24
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – 32 गुण
तार्किक आणि विश्लेषणात्मक प्रश्न – 24 गुण
इंग्रजी – 40 गुण
पाच वर्षे कालावधीच्या एलएल.बी. साठी –
कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर तर्क – 32 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – 24 गुण
तार्किक आणि विश्लेषणात्मक प्रश्न – 32 गुण
इंग्रजी – 24 गुण
गणित – 8 गुण