Lawrence Bishnoi : माजी मंत्री बाबा सिद्धकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅंग ने घेतली आहे. यानंतर या गॅंग बद्दल मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या (NIA) ने देखील लॉरेन्स बिश्नोई गॅंग (Lawrence Bishnoi) बाबत मोठे खुलासे केले आहेत. NIA ने दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गॅंग जवळ आत्ता जवळपास 700 शूटर आहेत. एवढेच नव्हे तर बिश्नोई गॅंग सुद्धा दाऊद इब्राहिम च्या पावलावर पाऊल टाकत आहे. NIA ने कमीत कमी 16 गँगस्टररांच्याविरुद्ध (युएपीए) च्या अंतर्गत चार्ज शीट फाईल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लॉरेन्स बिश्नई आणि गोल्डी बरार यांच्या देखील नावाचा समावेश आहे. या चार्ज शीट मध्ये दावा केला आहे की लॉरेन्स बिश्नोई गॅंग हे दाऊद इब्राहिम ची कंपनी डी कंपनीच्या मार्गावर पाऊल ठेवत पुढे चालत आहे.
NIA च्या चार्जशीट नुसार लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि त्यांचा आतंक पसरवण्याचा अंदाज हा दाऊद इब्राहिमच्या प्रमाणेच असून नव्वदीच्या दशकामध्ये दाऊद इब्राहिमची गॅंग सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात फैलावत होती. ड्रग्जची तस्करी करत दाऊद इब्राहिम ९०च्या दशकामध्ये आपलं नेटवर्क वाढवायला सुरू केली होती. त्यानंतर या गॅंग ने खंडणीचं काम सुरू केलं. आणि नंतर या गॅंगला ‘डी कंपनी’चे नाव देण्यात आलं. एवढेच नाही तर ही गॅंग पाकिस्तानच्या आतंकवादाशी सुद्धा जोडली गेली. आणि याच पद्धतीने बिश्नोई गॅंगने सुद्धा छोटे-मोठे अपराध करायला सुरुवात केली आणि नंतर याचं रूपांतर मोठ्या गॅंग मध्ये झालं.
बिश्नोई गॅंग मध्ये 700 शूटर (Lawrence Bishnoi)
NIA ने दिलेल्या चार्जशिट मधील खुलासानुसार बिश्नोई गॅंग मध्ये सत्विंदर सिंह उर्फ गोल्डी बरार हा ही गॅंग चालवत आहे. जो सध्या कॅनडा पोलिसांच्या बरोबरच इंडियन एजन्सीच्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये आहे. याच्याशिवाय बिश्नोई गॅंग मध्ये 700 शूटर आहेत ज्यामध्ये 300 पंजाब मधील आहेत. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटोज फेसबुक, इंस्टाग्राम, youtube वर शेअर केले जातात. बिष्णोईला कोर्टात घेऊन जात असलेला फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करून युवकांना या गॅंग मध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे.
भारतभर बिश्नोई गॅंगचा आतंक (Lawrence Bishnoi)
2021-22 मध्ये याच गँग कडून खंडणीच्या रूपात करोडो पैसे गोळा केले गेले आणि विदेशात पाठवले गेले. चार्ज शीट मध्ये सांगितले गेले आहे की बिश्नोई गॅंग हरियाणा, दिल्ली, राजस्थान येथील गॅंग सोबत लागेबांधे करून असतात. आता मात्र लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा आतंक हा संपूर्ण भारतात पसरला असून यामध्ये पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली राजस्थान आणि झारखंड यांचा समावेश आहे.
युवकांना दिले जाते परदेशात पाठवण्याचे आमिष
असा आरोप आहे की, बिष्णोई गॅंग अनेक युवकांना परदेशात पाठवण्याचे आमिष देतात. कॅनडासारख्या देशात आम्ही तुम्हाला पाठवू असे आमिष इथल्या युवकांना दिले जातं आणि त्यांचा वापर गुन्हेगारीसाठी (Lawrence Bishnoi) केला जातो. NIA ने सांगितलं की खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिंडा पाकिस्तानात बिश्नोई गँगच्या शूटर चा वापर गुन्हे घडवण्यासाठी केला जातो.