Investment Tips : मजबूत नफा मिळवण्यासाठी श्री गणेशाकडून समजून घ्या गुंतवणुकीच्या ‘या’ 7 टिप्स !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. आज पासून देशभरात गणेसोत्सव साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृतीत कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी गणेशाची आराधना करणे शुभ मानले जाते. हे लक्षात घ्या की, चांगला गुंतवणूकदार कसे बनावे हे आपल्याला गणपतीकडून शिकता येईल. आज आपण श्रीगणेशच्‍या जीवनाशी संबंधित अशा 7 पैलूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्याचा योग्य पद्धतीने अवलंब केल्‍यास गुंतवणुकदारांना मजबूत रिटर्न मिळवता येऊ शकेल.

Happy Ganesh Chaturthi 2021 Wishes: Ganpati Images, Wishes, SMS, Wallpapers, Messages, Facebook, WhatsApp Status

1- आर्थिक प्रवासाची सुरुवात

कोणत्याही कामात यश मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे त्याची सुरुवात करणे होय. जर आपण मोठा फंड तयार करू इच्छित असाल तर त्याची सुरुवातही गुंतवणुकीच्या पहिल्या पायरीने होते. जर आपण अद्याप गुंतवणूक किंवा बचत करणे सुरू केले नसेल तर या दिशेने पाऊल टाकण्यासाठी गणेशोत्सवाची वेळ उत्तम आहे. Investment Tips

2 – हुशारीने गुंतवणूक करा

हे लक्षात घ्या कि, गणपतीचे डोके हे हत्तीचे आहे, जे बुद्धीचे प्रतीक मानले जाते. एक गुंतवणूकदार म्हणून आपण हुशारीने निर्णय घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही पर्यायामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्यातील सर्व पैलूंचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. अन्यथा योग्य माहितीशिवाय गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकेल. Investment Tips

Ganesh Chaturthi 2021: Decoding Ganpati Bappa with numerology

3- कोणत्याही निष्कर्षा पर्यंत पोहोचण्या आधी सर्वांचे म्हणणे ऐकून घ्या

गणपतीचे कान खूप मोठे असतात म्हणून त्याला सूपकर्ण असेही म्हंटले जाते. याचा अर्थ श्रीगणेश सर्वांचे म्हणणे ऐकतो. त्याचप्रमाणे, एक गुंतवणूकदार म्हणून आपण तज्ञ आणि बाजारातील विश्लेषकांचे देखील म्हणणे काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. याद्वारे गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती गोळा करून आपल्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे केव्हाही चांगले ठरेल. Investment Tips

4- ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा

असे म्हणतात कि, महर्षी वेद व्यास यांनी गणपतीसोबत महाभारताची रचना केली. क्षणभरही विश्रांती न घेता त्यांनी संपूर्ण महाकाव्य पूर्ण केले. यासाठी जवळपास तीन वर्षे लागली. यावरून गणपती आपल्या ध्येयाकडे किती लक्ष देतात, याची कल्पना येऊ शकते. अगदी अशाच प्रकारे जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. याद्वारे आपल्या ध्येयानुसार योग्य धोरण आखून पैसे गुंतवले तर मोठा फंड तयार व्हायला फारसा वेळ लागणार नाही. Investment Tips

Ganpati Visarjan 2021: Why Ganpati Visarjan happens on Anant Chaturdashi, know the story behind it. Ganpati Visarjan 2021 know why ganesh Visarjan is on anant chaturdashi | PiPa News

5- संयम बाळगा

लंबोदर या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणेशाचे मोठे पोट आहे. तो आपल्याला नेहमी निवांत मुद्रेत असल्याचे दिसते. यातून आपण हे शिकू शिकतो की, आपल्याकडेही गुंतवणुकीचे मोठे लक्ष्य असले पाहिजे आणि नेहमी संयम बाळगला पाहिजे. बाजारात कितीही चढ-उतार आले तरी आपल्या लक्ष्यावर संयमाने लक्ष ठेवावे. Investment Tips

6- मोदकाप्रमाणे नफा पहा

आपल्याला गणपतीजवळ मोदकांनी भरलेले ताट नेहमी दिसते. याप्रमाणे आपणही आपल्या नफ्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. गुंतवणूक म्युच्युअल फंडात केली असेल किंवा शेअर बाजारात केली असेल. आपल्या रिटर्नवर नेहमीच लक्ष ठेवा. तरच आपण येणार्‍या नुकसानीचा अंदाज घेऊन त्यापासून संरक्षण करू शकू. Investment Tips

Ganesh Chaturthi 2020: Wish your loved ones this Happy Ganesh Chaturthi images photos message and whatsapp status - Ganesh Chaturthi 2020: इस गणेश चतुर्थी पर ऐसे दें अपनों को शुभकामनाएं

7-लवचिकतेने दूर होतील अडथळे

गणपतीची लांब सोंड आपल्याला लवचिकता शिकवते. एक गुंतवणूकदार म्हणून जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये देखील लवचिकता आणली तर आपल्या देखील मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हंटले जाते कारण तो आपल्या भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो. Investment Tips

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.nseindia.com/market-data/live-market-indices

हे पण वाचा :

आता तिकीट कॅन्सलेशन चार्जवर देखील आकारला जाणार GST, रेल्वे विभागाने म्हटले कि…

Multibagger Stock : गेल्या 19 वर्षांत ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न !!!

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!