नवी दिल्ली वृत्तसंस्था: मागील काही वर्षांपासून देशात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे जुन्या पीक पद्धतीला फाटा देत शेतकरी नव्या पद्धतीचा अवलंब करून आधीक उत्पादन घेताना दिसत आहेत.
मल्टी लेयर फार्मिंग म्हणजेच बहुउद्देशीय पीक पद्धती , या पद्धतीचा वापर शेतकरी करत आहेत. या पद्धतीत शेतकरी तीन ते चार पिके घेऊन कमी कालावधीत नफा मिळवत आहेत. या शेती पद्धतीमध्ये केवळ मशागत, पाणी किंवा खर्चात बचत होते असं नाही तर नफ्याचे प्रमाणही वाढते. बहुउद्देशीय शेती पद्धती याविषयी माहिती घेऊया…
या पद्धतीच्या शेतीकरिता शेतकऱ्यांना आधी तीन ते चार पिकांची निवड करावी लागते. एक पीक जमिनीत म्हणजे आत येते तर दुसरे पीक जमिनीवर येतात अशी पिकांची निवड करावी. त्यानंतर द्राक्ष किंवा वेली सारख्या वाढणाऱ्या पिकांची निवड करावी. पिकांची निवड करताना माती परीक्षण, वायू ,पाणी यांचा आढावा घेऊनच ही पिक निवडावी. उदाहरणार्थ जर तुम्ही आल्याची लागवड शेतीच्या जमिनीच्या पोतानुसार फेब्रुवारी केली त्याची नीट लागवड झाल्यावर त्याच वेळी पालेभाजी ची निवड लागवड केली. याच शेतात तारेच्या सहाय्याने वेल असणाऱ्या पालेभाज्या फळभाज्यांची लागवड केली जाते. अशामुळे संपूर्ण जमिनीला वेल असणाऱ्या पिकांमुळे आधार मिळतो उन्हाच्या झळा थेट जमिनीवर पोहोचत नाहीत किंवा अवकाळी पाऊस झाला तरी पिकाला फटका बसत नाही. ही लागवड झाल्यानंतर मध्येच पपई सारख्या फळपिकांची लागवड केली जाते.
बहुउद्देशीय शेतीसाठी महत्वाचे मुद्दे
-पिकाची निवड आणि लागवड महत्वाची
-उन्हाळ्या ऐवजी हिवाळ्याची निवड करा.
– एका वेळी तीन ते चार पीके यामध्ये घेतली जातात त्यामुळे सर्वांची लागवड करताना पिकांना फटका बसणार नाही याची खबरदारी घ्या
– जवळच्या कृषी केंद्राचा सहकार्य जरूर घ्या
– संपूर्ण वर्षाचे नियोजन करून पिकांची निवड ,लागवड, मशागत सर्व ठरवून घ्या.
किती होइल फायदा ?
-जर सर्व काही नीट झाले तर तुम्हाला नियमित उत्पन्नापेक्षा चार ते आठ पट नफा मिळू शकतो.
– या शेतीमुळे कमी खर्चात जास्त नफा मिळतो. एका पिकामुळे दुसऱ्या पिकाला पोषकतत्व मिळतात.
-पाणी ,खते आणि मशागत यांची बचत झाल्याने होणारा फायदा ही मोठा आहे.
– ढोबळमानाने हिशेब काढला तर एक वर्षात एक एकर शेतीत पाच ते सात लाख रुपयांची बचत होते.
– एकाच जमिनीत सर्व पिके घेतली जातात त्यामुळे नुकसानीचा धोकाही खूप कमी राहतो परिणामी नफा निश्चित वाढतो.