हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Leh Ladakh Bike Trip) जगभर भ्रमंती करणे ही अनेक लोकांच्या बँकेट लिस्टमधील एक खास विश असेल. जगभरात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना एकट्याला फिरायला खूप आवडत असेल. तुम्ही बाईक रायडर्स पाहिले असालंच!! मस्त एकटे भुंग.. करत बाईकवरून लांबचा पल्ला गाठतात. एका मस्त लॉन्ग ड्राइव्हची जर्नी एकटेच एन्जॉय करतात. असे रायडर्स अनेकदा लॉन्ग राईडसाठी जोखीमीची ठिकाणं निवडतात. यांपैकी सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे लेह लडाख.
कितीतरी बाईक रायडर्स एकटे किंवा ग्रुपसोबत लेह लडाखचा पल्ला गाठतात. तसं बोलायचं झालं तर, लेह लडाखची ट्रिप अत्यंत सुंदर आणि नेत्रदीपक दृश्यांनी भरलेली आहे. निसर्गाचे तेजस्वी रूप, वाटेत दिसणारी लहान मोठी गावं, सुंदर डोंगर आणि लांबपर्यंत जाणारा रस्ता एक वेगळीच मुसाफिरी एन्जॉय करायला मदत करतो. (Leh Ladakh Bike Trip) कितीही आनंददायी वाटत असला तरीही हा प्रवास सोपा नाहीये, हे लक्षात घ्या. लेह लडाखला बाईकने प्रवास करताना बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्यांवर मात करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्या. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
सर्व रस्त्यांची नीट माहिती घ्या
लेह- लडाखला जायचं म्हणजे खायचं काम नाही. त्यामुळे प्रवासाचं प्लॅनिंग करताना इथल्या सगळ्या रस्त्यांची, गावांची आणि ठिकाणांची पूर्ण माहिती घ्या. (Leh Ladakh Bike Trip) केवळ लेह- लडाख नव्हे तर कुठेही फिरायला निघण्याआधी त्या ठिकाणाची पूर्ण माहिती घेणे गरजेचे असते. यामुळे प्रवास करताना राहण्या- खाण्यापिण्याची सोया याबाबत माहिती मिळवता येते. तसेच सर्व बाबींचा अभ्यास असल्यामुळे प्रवास सुखकर होतो.
पुरेशी रोख
बाहेर निघताना कायम आवश्यक तितकी रोख जवळ ठेवावी हा एक महत्वाचा नियम पाळा. लेह- लडाखला जातानादेखील हा नियम पाळणे तुमच्यासाठी गरजेचे राहील. (Leh Ladakh Bike Trip) कारण इथे बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसल्याने ऑनलाईन पेमेंट करणे अवघड जाईल. शिवाय आसपास ATM असेलच अशी काही शाश्वती नाही. त्यामुळे लेह लडाखला बाईकने प्रवास करताना तुमच्यासोबत पुरेशी रोख रक्कम ठेवा.
गरजेचं सामान
प्रवास जवळचा असो किंवा लांबचा.. आपल्यासोबत आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू असायला हव्या. सील आणि पॅकेज्ड फूड, सुखा खाऊ, ड्रायफ्रूट यासोबत एनर्जी ड्रिंक, रुटीन केअरच्या गोष्टीदेखील सोबत ठेवा. (Leh Ladakh Bike Trip) बाईकवरून प्रवास करण्यासाठी चांगल्या दर्जाचे सेफ्टी गियर वापरा. तसेच बाईकच्या पेट्रोल काट्यावर लक्ष ठेवा आणि किती अंतरावर पुढील पेट्रोल पंप आहे याची नीट माहिती ठेवा.
शारीरिक काळजी महत्वाची (Leh Ladakh Bike Trip)
तुम्ही कोणत्याही ठिकाणी फिरायला जात असाल तर सगळ्यात आधी आपण शारीरिकरित्या तेथील वातावरणाशी मिळवून घेऊ शकतो का? यासाठी आपण फिट आहोत का? यासाठीच्या चाचण्या करून घ्या. त्यात लेह- लडाख सारख्या डोंगराळ ठिकाणी बाईकने जाण्यापूर्वी तुम्ही शारीरिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला महत्वाचा ठरेल. तसेच प्रवासाला निघताना सामानात आठवणीने तुमच्या औषधांचा डब्बा घ्या. शिवाय तज्ञांनी सुचवलेली औषधे देखील जरूर सोबत ठेवा आणि मगच प्रवासाला सुरुवात करा.