Less Investment Business | कमी खर्चात सुरु करा हा व्यवसाय; महिन्याभरातच मिळेल भरघोस नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Less Investment Business आजकाल अनेक लोकांना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय चालू करावा असा वाटतो. परंतु जेव्हा जेव्हा स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा विचार मनात येतो, त्यावेळी त्या व्यवसायाला लागणारे भांडवल कसे जमा करायचे? हा विचार देखील माणूस करतो. आणि त्यातूनच व्यवसाय सुरू करण्याचा त्याचा विचार तो मागे घेतो. त्यामुळे अनेकजण कमी गुंतवणुकी जास्तीत जास्त कसा नफा मिळवता येईल असे व्यवसाय शोधत असतात.

आजकाल खूप व्यवसाय आहेत. परंतु या व्यवसायातून नक्की कोणता व्यवसाय करावा. आपल्या परिसरात कोणता व्यवसाय जास्त प्रमाणात चालेल. या सगळ्याचा निर्णय घ्यायला देखील खूप वेळ लागतो. आज आपण आपल्या लेखांमध्ये कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याची माहिती पाहणार आहोत.

मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय | Less Investment Business

आज-काल मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय खूप चांगला चालत आहे. दिवसेंदिवस या व्यवसायांची वाढ होत आहे. मोबाईल किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या व्यवसायातून केली जाते. यामध्ये इयरफोन, चार्जर, ब्लूटूथ, मोबाईल यांसारख्या विविध गोष्टी विकल्या जातात. त्याचप्रमाणे लाइटिंग, स्पीकर, कार्डरीडर, मोबाईलचा स्टॅन्ड, साऊंड बार इत्यादी अनेक गोष्टी तुम्ही या मोबाईल ॲक्सेसरीज दुकानांमध्ये ठेवू शकता.

परंतु हा व्यवसाय (Less Investment Business) सुरू करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला आजकाल कोणत्या गोष्टी ट्रेंडमध्ये आहेत? कोणत्या गोष्टींची क्रेझ जास्त आहे? या गोष्टी शोधाव्या लागेल आणि त्यानंतर त्या वस्तूंचा समावेश तुम्हाला व्यवसायामध्ये करावा लागेल.

त्याचप्रमाणे एका वेळेला अनेक वस्तू खरेदी करू नये. ग्राहकांची मागणी पाहता गोष्टींची खरेदी करावी. त्याचप्रमाणे काही पर्याय देखील उपलब्ध असावे. जेणेकरून जर एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू घ्यायची असेल, तर त्याकडे तुमचे पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे.

कोणत्या जागी सुरू करावा हा व्यवसाय?

मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची व्यवस्थित गरज लागत नाही. तुम्ही एखाद्या सार्वजनिक बाजारपेठेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी एक आता छोटासा स्टॉल लावून देखील तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमची नोकरी सांभाळून देखील अर्धवेळ हा व्यवसाय करू शकता.

किती नफा मिळतो ?

मोबाईल ॲक्सेसरीजच्या व्यवसायातून तुम्हाला तुमच्या खर्चापेक्षा एक ते दोन पट जास्त नफा मिळतो. जर तुम्ही एखादी वस्तू 12 रुपयाला खरेदी केली, तर तुम्ही 50 रुपयाला सहजपणे विकू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही सुरुवातीला 5000 रुपये गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. कारण जसा तुमचा व्यवसाय वाढेल तसतसे उत्पन्न वाढेल तसे तुम्ही गुंतवणूक वाढवा आणि या व्यवसायाचा विस्तार करा.