Monsoon Picnic Spot| गेल्या दोन महिन्यांपासून कडक उन्हाळ्यामुळे लोक हैराण झाले होते. परंतु आता पावसाच्या रिमझिम सरी बरसण्यास सुरुवात झाल्यामुळे वातावरणात थंडावा जाणवू लागला आहे. अशा वातावरणामध्ये एखाद्या थंडगार ठिकाणी फिरायला जावेसे वाटते. कारण पावसाळा सुरू झाला की, निसर्गाचे सौंदर्य आणखीन फुल लागते. तसेच धबधबे कोसळण्यास सुरूवात होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे गेल्यावर तुम्हाला सर्वात सुखद अनुभव होईल.
माळशेज घाट – माळशेज घाट हा निसर्ग सौंदर्याचे एक सुंदर उदाहरण आहे. या घाटामध्ये गेल्यानंतर सर्वत्र हिरवाई दिसून येते. या घाटातून दूरवर आपल्याला फक्त डोक्यांची चादर त्यात दडलेले डोंगर आणि दुधासारखे कोसळणारे धबधबे दिसून येतात. (Monsoon Picnic Spot) माळशेज घाटा फोटोग्राफरचा तर अतिशय आवडता स्पॉट आहे. या घाटामध्ये अनेक कपल ही फिरण्यासाठी जात असतात. या घाटाच्या जवळच हरिश्चंद्रगड ही आहे. जिथे भेट देता येऊ शकते.
दापोली – शहराच्या गर्दीपासून दूर निवांत आणि स्वच्छ म्हणून ओळखले जाणारे दापोली हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षित केंद्र आहे. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्य दिसून येईल. येथे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर जाऊन मनमुराद आनंद लुटता येईल. त्यामुळे या पावसाळ्यात आवश्यक दापोलीला भेट द्या.
भीमाशंकर – भीमाशंकर हे घनदाट अरण्याने वेढलेले ठिकाण आहे. याचठिकाणी भगवान शंकराचे ऐतिहासिक मंदिर आहे. त्याचबरोबर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी अशी इतर ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. हे ठिकाण पावसाळ्यामध्ये तर अतिशय सुंदर दिसते. शाळेच्या सहली असो, कुटुंबासोबत ट्रीप काढायची असो किंवा बायकोसोबत फिरायला जायचं असो हे ठिकाण सर्वांसाठी बेस्ट पर्याय ठरते.
इगतपुरी – महाराष्ट्रात राहून स्वर्ग पहायचा असेल तर इगतपुरीला अवश्य भेट द्यावी. याठिकाणी केल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे अद्भूत रूप पाहायला मिळेल. पावसाळ्यामध्ये तर इगतपुरीचे सौंदर्य आणखीन खुलते. इगतपुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, थाल घाट, म्यानमार गेट, अशा अनेक ठिकाणी फिरता येतील.
चिखलदरा – विदर्भ भागातील एकमेव थंडगार हवेचे ठिकाण म्हणजेच चिखलदरा. पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी जात असतात. आजच्या घडीला चिखलदरा हे सुंदर पर्यटक स्थळांमध्ये गणले जाते. (Monsoon Picnic Spot) तुम्हाला जर शहराच्या गोंधळापासून सुटका करायची असेल आणि एखाद्या निवांत ठिकाणी भेट द्यायची असेल तर चिखलदरा हा चांगला पर्याय आहे. येथे गेल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे अद्भुत रूप पाहायला मिळेल.