LIC Jivan Shanti Scheme | LIC ची जबरदस्त योजना; दरमहा मिळेल 26 हजार रुपयांपर्यंत पेन्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भविष्याचा विचार करून अनेक लोक आत्ताच आर्थिक गुंतवणूक करून ठेवतात. जेणेकरून उतारवयात त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही. तसेच असा विचार करून आर्थिक गुंतवणूक करणे हे खूप गरजेचे आहे. कारण दिवसेंदिवस महागाई वाढलेली आहे. लोकांची जीवनशैली देखील बदलत आहे. तसेच आजकाल सरकार देखील गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत आहे. आपण बाजारात पाहिले तर अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असतात. परंतु तुमचे पैसे सुरक्षित आहे का? आणि त्यातून किती परतावा मिळेल? या सगळ्याची माहिती घेऊनच तुम्ही गुंतवणूक (LIC Jivan Shanti Scheme) केली पाहिजे. जेणेकरून तुमचे निवृत्तीनंतरच्या आयुष्य आरामदायी जाईल.

तुम्ही देखील भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि त्यासाठी एखादी योजना शोधत असाल, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगाचा आहे. कारण तुमच्यासाठी LIC ची (LIC Jivan Shanti Scheme) जीवन शांती ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला पेन्शनची सुविधा देखील मिळणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो, तसेच तुमचे पैसे देखील सुरक्षित असतात.

या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला जीवन विम्याचाही लाभ मिळतो. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य या योजनेमध्ये सुरक्षित आहे. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे गुंतवू शकता. योजनेमध्ये कमाल मर्यादा नाही. परंतु किमान रक्कम दीड लाख रुपये असायला हवी.

काय आहे जीवन शांती योजना? | LIC Jivan Shanti Scheme

जीवन ओम शांती योजना ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही एकाच वेळी रक्कम भरून योजनेचा लाभ घेऊ शकता .त्यानंतर LIC आयुष्यभर एका ठराविक अंतराने तुम्हाला नियमितपणे पैसे देत राहील. ही पैसे तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा सहामासिक किंवा वर्षाच्या आधारावरती देखील मिळेल. या योजनेत तुम्हाला दोन पर्याय मिळतात पहिला तत्काळ वार्षिकी आणि दुसरा स्थगित वार्षिकी.

या योजनेमध्ये तुम्ही एक रकमी पैसे भरल्यास तुम्हाला निवडलेल्या पेमेंट कालावधीनुसार पैसे मिळतात. तुम्ही जर मासिक पेमेंट मिळाले, तर तुम्हाला पहिल्या महिन्यापासून पेमेंट मिळेल. तुम्ही सिंगल प्रीमियर भरून या योजनेत गुंतवणूक केली, तर ठराविक वर्षांना तुम्हाला यातील पैसे मिळू शकतात. ज्या लोकांना निवृत्तीनंतरची आर्थिक सोय करायची आहे, त्यांच्यासाठी हा अत्यंत उत्तम पर्याय आहे.

कोण गुंतवणूक करू शकतो?

LIC च्या या नवीन योजनेमध्ये तुम्ही 5, 10, 15 किंवा 20 वर्षानंतर पेन्शन सुरू करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पेन्शन योजनेचा तत्काळ लाभ देखील घेऊ शकता. परंतु ही पॉलिसी घेताना तुमचे वय किमा 30 वर्ष असणे गरजेचे आहे. जीवन शांती योजनेमध्ये तुम्हाला सुरुवातीला किमान 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे .यामध्ये कमाल गुंतवणूक करण्याला कोणतीही मर्यादा नाही.

पेन्शन कशी मिळवायची? | LIC Scheme

LIC च्या या योजनेमध्ये तुम्ही 20 वर्षासाठी 15 लाख गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला 26 हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळेल. आणि हेच पेन्शन जर तुम्हाला वार्षिक घ्यायची असेल, तर तुम्हाला 3.12 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचा दर अकाली मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आणि नॉमिनीला इतर पेन्शनचा लाभ दिला जाईल.