एलआयसीची जबरदस्त योजना!! एकदा गुंतवणूक केल्यास मिळेल भरघोस परतावा

Smart Pension Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय जीवन विमा महामंडळ (Life Insurance Policy) वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त विमा आणि गुंतवणूक योजना सादर करत असते. काही महिन्यांपूर्वीच एलआयसीने आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी स्मार्ट पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना खास निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी बनवण्यात आली आहे. यामध्ये एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर पेन्शन मिळण्याची सोय आहे.

खाते उघडण्याची प्रक्रिया

एलआयसीची ही योजना वैयक्तिक तसेच संयुक्त स्वरूपात घेतली जाऊ शकते. जर संयुक्त खाते उघडले असेल आणि एका खातेदाराचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या खातेदाराला आजीवन पेन्शन मिळत राहील. विशेष म्हणजे, या योजनेत निवृत्तीनंतर लगेचच पेन्शन सुरू होण्याचीही तरतूद आहे.

पॉलिसीधारक त्यांच्या सोयीप्रमाणे मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात पेन्शन घेऊ शकतात. त्याशिवाय, अॅन्युइटीच्या (निश्चित उत्पन्न योजनेच्या) माध्यमातून देखील पेन्शनचा लाभ घेता येतो. पॉलिसीधारकाच्या निधनानंतर, योजनेत नमूद केलेल्या नॉमिनीला या योजनेचा लाभ दिला जातो.

कुठे आणि कसे खरेदी करू शकता?

  • एलआयसीचा स्मार्ट पेन्शन प्लॅन ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी खरेदी करू शकतात.
  • ऑनलाइन खरेदीसाठी: एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागतो.
  • ऑफलाइन खरेदीसाठी: एलआयसी एजंट, पीओएसपी-लाइफ इन्शुरन्स किंवा कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटर्सच्या माध्यमातून योजना खरेदी करता येते.

गुंतवणूक आणि लाभाचे स्वरूप

या योजनेअंतर्गत किमान 1 लाख रुपये गुंतवावे लागतात. एकदा पूर्ण प्रीमियम भरल्यानंतर निवडलेल्या अटींनुसार पेन्शन सुरू होते. विशेष म्हणजे, कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेनुसार पेन्शनचा लाभ वाढू शकतो. या योजनेतून ग्राहकांना काही प्रमाणात किंवा पूर्ण रक्कम काढण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तसेच, पॉलिसी सुरू झाल्यानंतर केवळ तीन महिन्यांत कर्ज सुविधा देखील मिळू शकते.

कोण पात्र आहे?

  • या योजनेसाठी 18 ते 100 वर्षे वयोगटातील कोणीही अर्ज करू शकतो.
  • एकल किंवा संयुक्त स्वरूपात गुंतवणूक करता येते.
  • पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याचा नॉमिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

दरम्यान, एलआयसीच्या या योजनेचा उद्देश नागरिकांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळावे, हा आहे. जीवनभर स्थिर उत्पन्न देणाऱ्या या योजनेमुळे वृद्धापकाळात आर्थिक चिंता कमी होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या गरजा आणि आर्थिक नियोजन लक्षात घेऊन ही योजना निवडल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा त्यांना नक्कीच मिळू शकतो.