शनिवार आणि रविवारी सुरू राहणार देशभरातील LIC ची सर्व कार्यालये; नेमके कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपणार आहे. या पार्श्वभूमीवरच एलआयसीने (LIC) येत्या 30 आणि 31 मार्च रोजी देशभरातील आपली सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील एलआयसीची सर्व कार्यालय शनिवारी आणि रविवारी सुद्धा सुरू राहणार आहेत. एलआयसीने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना त्यांची पेंडिंग कामे रविवारच्या सुट्टीच्या वेळी करता येणार आहेत.

सध्याच्या घडीला मार्च एंडिंगमुळे बँकांपासून ते शासकीय कार्यालये आपली कामे उरकण्यासाठी धडपड करत आहेत. अशातच एलआयसीने देखील 30 ते 31 मार्च रोजी आपली सर्व कार्यालय सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने सर्व विमा कंपन्यांना आपली कार्यालय शनिवारी आणि रविवारी सुद्धा उघडी ठेवण्याचा सल्ला दिला होता. यानंतरच ग्राहकांच्या सोयीसाठी एलआयसीने शनिवारी आणि रविवारी कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचे म्हणजे, रिझर्व्ह बँकेने देखील 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपणार असल्यामुळे या तारखेपर्यंत सर्व बँकांना खुले राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळेच आता, देशातील बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा प्रमुख बँकांसह इतर बँका देखील रविवारी सुरू राहणार आहेत. यामुळे बँक धारकांना देखील रविवारच्या वेळी बँकेशी संबंधित इतर कामे पूर्ण करता येणार आहेत.

दरम्यान, येत्या 30 आणि 31 मार्च रोजी एलआयसी कार्यालय देशातील बँकांसह आयकर विभागाचे कार्यालयही सुरू राहणार आहे. गुड फ्रायडेमुळे आयकर विभागाने सलग तीन दिवस येणारे सुट्टी रद्द केली आहे. यामुळे आता 30 आणि 31 मार्च रोजी देखील आयकर विभागाची कामे सुरू राहणार आहेत. हा निर्णय आर्थिक संपत असल्यामुळे घेण्यात आला आहे.